ओमायक्रॉन दोन आठवड्यांपेक्षा जास्त झाला जुना, जाणून घ्या, किती आहे प्रभावी? | पुढारी

ओमायक्रॉन दोन आठवड्यांपेक्षा जास्त झाला जुना, जाणून घ्या, किती आहे प्रभावी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन येऊन दोन आठवड्यांहून जास्त दिवस झाले. या कालावधीत, दक्षिण आफ्रिकेतील प्राथमिक माहितीवरुन असे दिसून येते की, हा विषाणू पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा खूप वेगाने पसरतो. पण त्यामुळे गंभीर आजार झाल्याचे दिसत नाही. आत्तापर्यंत संपूर्ण जगात यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. या व्हेरियंटबद्दल बरेच काही शोधणे बाकी असल्याच बोललं जात आहे.

Bloomberg च्या अहवालानुसार, या व्हेरियंटबद्दल आत्तापर्यंत काहीही निश्चित नाही, म्हणून जग अजूनही व्हेरियंटबद्दल काहीसे अंधारात आहे. अहवालात असे म्हटले आहे की, ब्रिटन या विकसित देशात ओमायक्रॉनचे रुग्ण काही दिवसांनी दुप्पट होत आहेत. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार होत आहे. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेतील परिस्थिती बिघडू शकतो.

अहवालात असंही म्हटले आहे की, २०२१ च्या शेवटी असं वाटत होतं की २०२२ मध्ये परिस्थिती बदलली असेल, पण ओमायक्रॉनने आता ते अस्पष्ट झाले आहे. आणि परिस्थिती २०२१ सारखी कमी-अधिक असू शकते. असंही अहवालात म्हटलं आहे.

प्राथमिक प्रयोगशाळेतील संशोधन अभ्यास दर्शवितात की ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, जे जगभरात वेगाने पसरत आहे. अभ्यासात असेही दिसून आले आहे की हा व्हेरियंट लसीकरण केलेल्या लोकांना देखील संक्रमित करतो. याशिवाय, यामुळे आधीच कोविडची लागण झालेली व्यक्ती आजारी पडू शकते.

आतापर्यंतच्या अभ्यासातून हे समोर आले नाही की कोविडचा नवीन प्रकार कसा विकसित झाला? आणि यामुळे दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये अधिक गंभीर रोग होऊ शकतो?.

‘ओमायक्रॉन’चाचणी अहवाल मिळणार २ तासांमध्‍ये

कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनचे रुग्‍ण देशातील विविध राज्‍यांमध्‍ये आढळत आहेत. आता आसाममधील दिब्रुगड येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्‍या (आयसीएमआर) शास्‍त्रज्ञांनी एका किटची निर्मिती केली आहे. या किटमुळे ओमायक्रॉन चाचणी (Omicron test) अहवाल दोन तासांमध्‍ये मिळणार आहे. ‘ओमायक्रॉन’चाचणी (Omicron test) किट लवकरच बाजारात उपलब्‍ध होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दिब्रुगड ‘आयसीएमआर’च्‍या टीमने २४ नोव्‍हेंबरपासून किट निर्मितीवर संशाेधन सुरु केले हाेते. ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. विश्‍वज्‍योति बोरकाकोटी यांच्‍या नेतृत्‍वाखाली दिब्रुगड आयसीएमआर आणि प्रादेशिक वैद्‍यकीय संशोधन केंद्राने संयुक्‍तपणे किटची निर्मिती केली आहे. त्‍यांनी सुमारे एक हजार रुग्‍णांची चाचणी (Omicron test) केली. यामध्‍ये अन्‍य राज्‍यांतील रुग्‍णांचाही समावेश होता.

हेही वाचलत का?

Back to top button