देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर - पुढारी

देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ धामचे (कॉरिडॉर) उद्घाटन हाेत आहे. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी येथे पाेहचले. त्‍यांनी कालभैरव मंदिरात आरती केली. त्यानंतर त्यांनी गंगा नदीत स्नानही केले. देशभरात भाजपकडून लाईव्ह सोहळा सुरु आहे. या सोहळ्याचे लाईव्ह मुंबईमध्येही सुरु आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकाच ठिकाणी उपस्थित होते.

यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता टीका करत आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये टीका, आरोप प्रत्यारोप सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण आज एकाच मंचावर तसेच एकाच ठिकाणी बसल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

 

Back to top button