Rahul Gandhi : “हिंदुत्ववाद्यांना सत्ता पाहिजे; पण सत्य नको आहे” | पुढारी

Rahul Gandhi : "हिंदुत्ववाद्यांना सत्ता पाहिजे; पण सत्य नको आहे"

पुढारी ऑनलाईन डेस्क : “हिंदू सत्यासाठी मरतो. त्याचा जीवन प्रवास हा सत्याच्या शोधासाठी असतो. महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्याच्या शोध घेतला. मात्र, हिंदुत्ववादी गोडसेने त्यांच्या छातीत ३ गोळ्या मारल्या. हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही घेणदेणं नाही. सत्याच्या शोधाकरिता हिंदू कधीच झुकत नाही; पण हिंदूत्ववादी द्वेषाने भरलेला असते. कारण, त्याच्या मनात भीती असते”, असं मत काॅंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी  व्यक्त केले.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये महागाईविरोधात आयोजित केलेल्या मेगा रॅलीमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “हिंदुत्ववाद्यांना सत्तेची भूक लागलेली असते. २०१४ हे हिंदुत्ववादी सत्तेत आहे. पण, हिंदू सत्तेबाहेर आहे. त्यामुळे आपल्याला हिंदुत्ववाद्यांना बाजूला सारून हिंदुंना सत्तेत आणायला हवं. आम्हाला घाबरवलं जाऊ शकत नाही. आम्ही मृत्यूला घाबरत नाही. हिंदुत्ववाद्यांना सत्ता पाहिजे, पण सत्य नको आहे. हिंदू भीतीचा सामना करतो. तो महादेवासारखा आपल्या भितीलाच पिऊन टाकतो.”

या वेळी काॅंग्रेस नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, ” केंद्रातील सरकार हे जनतेची कल्याण करू इच्छित नाही. आमचे पर्यटक नरेंद्र मोदी पंतप्रधान निवासापासून १० शेतकरी आंदोलकांना भेटायला गेले नाहीत. पण, संपूर्ण जग फिरून आले. हे सरकार केवळ काही उद्योगपतींसाठी काम करतं आहे. मोदीजी, ७० वर्षांचं रडगाणं बंद करा आणि मागील ७ वर्षांत काय केलं ते सांगा”, असाही सवालही प्रियांका गांधी यांनी केला.

“महागाईनं सर्वसामान्‍य नागरिकांचे जगणं मुश्कील झालं आहे. त्यामुळेच तुम्ही या रॅलीमध्ये आला आहात. घरगुती गॅस सिलिंडर १००० रुपयांना झाला आहे. सरकार जाहिरातीवर जेवढा खर्च करत आहे, तेवढा खर्च शेतकऱ्यांवर करत नाही. हे सरकार फक्त काही मोजक्याच उद्योगपतींसाठी काम करत आहे”, असाही आरोपही प्रियांका गांधी यांनी या वेळी केला.

हेही वाचलं का?

Back to top button