सरकारी नोकरी : संरक्षण विभागात 458 पदांसाठी भरती
पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक तरुण बेरोजगारीला सामोर जाव लागलयं. आता संरक्षण मंत्रालयान भरती काढली आहे. त्यामुळे तरुणांना सरकारी नोकरी ची संधी मिळणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने सी / ओ 56 एपीओ च्या 41 फील्ड दारूगोळा डेपोमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण 458 रिक्त जागा भरती करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी अधिसूचनेच्या तारखेपासून 21 दिवसांपर्यंत म्हणजे 30 जुलै पर्यंत अर्ज करू शकतात.
हे ही वाचा :
- जळगाव : एस पी कार्यलयातच दोन कुटुंबियांमध्ये तुफाण हाणामारी
- कोरोनाची तिसरी लाट कोणत्याही परिस्थितीत रोखावीच लागेल : पंतप्रधान
पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी, बारावी, पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा.
वयाची मर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष पेक्षा जास्त नसावं.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.
- नाशिक : सावकी येथे घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
- दहावीच्या निकालानंतर: वेबसाईट डाऊन, पालकांचा संताप
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18000 ते 92,300 रुपये पगार मिळणार आहे.
असा करा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवार या संकेतस्थळासाठी अधिकृत अर्ज indianarmy.nic.in या संकेतस्थळावर भरुन खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात.
पत्ता- कमांडंट, 41 फील्ड दारूगोळा डेपो, पिन – 909741.
- Happy B’day कॅटरीना; चित्रपट बूममधून केला होता डेब्यू, आज इतक्या कोटींच्या संपत्तीची मालकीण
- स्पृहा जोशी आता दिसतेय आणखी सुंदर
पदांची संख्या 458
पद संख्या
ट्रेड्समन 330
जेओए (एलडीसी) 20
मटेरिअट असिस्टंट 19
एमटीएस 11
फायरमॅन 64
255 (आई) एबीओयू ट्रेड्समन मेट 19
हे वाचलत का :
- एसएससी निकाल : दहावीचा निकाल ९९.५५ टक्के, यंदाही मुलींची बाजी
- दहावी निकाल आज दुपारी; कुठे आणि कसा पहाल
- लष्कर-ए-तोयबा : श्रीनगरमध्ये आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा