कोल्हापुरातील सर्व व्यापार सुरू होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे | पुढारी

कोल्हापुरातील सर्व व्यापार सुरू होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरमध्ये कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याने सोमवारपासून शहरातील सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी देऊ, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी सरसकट व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. या मागणीला टोपेंनी दुजोरा दिला आहे.

जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्याने व्यापाऱ्यांना प्रशासनाच्या सुचनांचं पालन करावे लागणार आहे. सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात व्यापार सुरू करण्यास परवानगी दिल्याने व्यापारी शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

अधिक वाचा :

दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

त्यातच तिसर्‍या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे.

कोल्हापूरचा संसर्ग दरही राज्यात सर्वाधिक आहे. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे.

त्यामुळेच पाहणीसाठी केंद्रीय पथक आले आहे.

अधिक वाचा : 

जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी हे पथक चर्चा करणार आहे.

राज्यात पहिल्यांदा कोल्हापूर शहरातील व्यापार्‍यांनी लॉकडाऊनविरुद्ध बंड पुकारले होते.

व्यापारी व्यवसाय करण्यावर ठाम राहिले होते.

अधिक वाचा :

राज्यकर्त्यांचे धाबे दणाणले आणि शासनावर नामुष्कीची वेळ येऊ नये यासाठी शेवटच्या क्षणी कोल्हापूरला पाच दिवस लॉकडाऊन उठविण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती.

कोल्हापूर शहरवासीय व व्यापार्‍यांच्या निर्धारामुळे हे शक्य झाले.

परंतु निर्णय झाल्यानंतर त्याचा श्रेयवाद सुरू झाला. यात व्यापार्‍यांचे नेतेही पुढे होते.

हे ही वाचा : 

हे ही पाहा :

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button