‘ऑक्सिजनअभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती महाराष्ट्राने दिली नाही’ | पुढारी

‘ऑक्सिजनअभावी दगावलेल्या रुग्णांची माहिती महाराष्ट्राने दिली नाही’

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  ऑक्सिजनअभावी किती रुग्ण दगावले, याची माहिती केंद्राने राज्यांकडे मागविली होती, पण या रुग्णांची माहिती महाराष्ट्र शासनाने ती माहिती दिली नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांनी शुक्रवारी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना सांगितले. काँग्रेसचे सदस्य खासदार बाळू धानोरकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनअभावी कितीजण दगावले, याची माहिती केंद्राने मागविली होती. १९ राज्यांनी सदर माहिती दिली. त्यात महाराष्ट्राचा समावेश नव्हता. प्राप्त माहितीनुसार केवळ पंजाबमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते, असे मंडविया यांनी स्पष्ट केले.

अतिरिक्त खर्चाला परवानगी देण्याचा प्रस्ताव

दरम्यान ३.७३ लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला परवानगी दिली जावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारने संसदेच्या पटलावर ठेवला आहे. लोकसभेत शुक्रवारी गदारोळातच कामकाजाला सुरुवात झाली. तथापि प्रश्नोत्तर आणि शून्य प्रहरासह उर्वरित कामकाज सुरळीतपणे पार पडले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिल्ली स्पेशल पोलीस इस्टब्लिशमेंट सुधारणा विधेयक तसेच केंद्रीय दक्षता आयोग सुधारणा विधेयक सादर केले.

हेही वाचा: 

Back to top button