ब्रेकिंग : शिवेंद्रराजेंच्या कार्यशैलीचे शरद पवारांकडून कौतुक, सिल्व्हर ओकवर झाली दोघांमध्ये भेट | पुढारी

ब्रेकिंग : शिवेंद्रराजेंच्या कार्यशैलीचे शरद पवारांकडून कौतुक, सिल्व्हर ओकवर झाली दोघांमध्ये भेट

सातारा; पुढारी वृत्तसेवा : अभयसिंह महाराजांच्या पावलांवरच पाऊल टाकून निघाला आहात. सातारा जिल्हा बँक तुम्ही खूप चांगली चालवली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे यांचे कौतुक केले. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर जाऊन आ. शिवेंद्रराजे यांनी पवारांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची मागणी केली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी कालच आ. शिवेंद्रराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत च त्यांनी आपण जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. अजितदादांचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी आ. शिवेंद्रराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली, गेल्या गेल्याच पवारांनी शिवेंद्रराजेच कौतुक केले.

राजे बँक चांगली चालवली आहे. अगदी अभयसिंह महारांजाच्या पावलावर पाऊल ठेवत निघाला आहात, अशा शब्दांत पवारांनी शिवेंद्रराजे यांचे कौतुक केले, जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजकारण नसल्याने बँक चांगली चालली आहे, आता ही मी सर्वाना बरोबर घेऊन वाटचाल केली होती. आपण संधी दिली तर चेअरमन म्हूणन काम करण्याची इच्छा आहे, असे शिवेंद्रराजे पवारांना म्हणाले. त्यावर तुम्ही अजितला भेटला का असे पवारांनी शिवेंद्रराजे यांना विचारले. आपली व अजितदादांची सविस्तर चर्चा झाली असल्याचे त्यांनी पवारांना सांगितले.

आपण रामराजे व पालकमंत्री यांच्याशी बोललो असल्याचे शिवेंद्रराजे म्हणाले. मीही अजित व रामराजेंशी बोलतो असे पवारांनी शिवेंद्रराजे यांना सांगितले. त्याचवेळी कोरेगाव व माणमधील जागा गेल्याची खंत पवारांनी शिवेंद्रराजे यांना बोलून दाखवली. सलग दोन दिवसांत शिवेंद्रराजे शरद पवार व अजित पवारांना भेटल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

Back to top button