Central Railway: मध्य रेल्वेच्या व्हिस्टाडोम डब्ब्यांना पावणे दोन लाख प्रवाशांची पसंती; २६.५० कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वे, व्हिस्टाडोम
मध्य रेल्वे, व्हिस्टाडोम
Published on
Updated on

रोहे, पुढारी वृत्तसेवा: मध्य रेल्वेच्या (Central Railway)  व्हिस्टाडोम डबे असलेल्या रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ते अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे लोकप्रिय ठरले आहेत.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेतील Central Railway गाड्यांवर चालणाऱ्या व्हिस्टाडोम डब्यांचा विचार करता १.७६ लाख प्रवाशांनी या डब्यांमधून प्रवासाचा आनंद घेतला असून २६.५० कोटींचे उत्पन्न मध्य रेल्वेला प्राप्त झाले आहे.

या गाडयांमध्ये प्रवाशांचा विचार केल्यास मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस ९९.२६ % म्हणजेच ३०,९८१ प्रवाशांसह सर्वात पुढे आहे. मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ९७.४९ % म्हणजेच ३१,१६२ प्रवासी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये ९५.४९ % म्हणजे ३०, ७५८ प्रवासी संख्या आहे. मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीनची व्याप्ती ९२.७२ % म्हणजेच २९, ७०२ प्रवासी अशी आहे. पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ८७.८४ % म्हणजे २४,२७४ प्रवासी आणि मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस ७७.८५ % म्हणजेच २९,५२७ प्रवाशांसह थोडक्यात मागे आहे.

Central Railway  मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस ७.६८ कोटी उत्पन्नासह सर्वात पुढे

या गाड्यांच्या उत्पन्नात मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस ७.६८ कोटी उत्पन्नासह सर्वात पुढे आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेसचे उत्पन्न ६.१६ कोटी इतके आहे. पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेसचे उत्पन्न ४.९८ कोटी. मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन २.७२ कोटी. मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसचे उत्पन्न २.६० कोटी आणि मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस २.३५ कोटी कमाईच्या अगदी मागे आहे.

२०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वेवर सादर करण्यात आले. प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे, मुंबई-मडगाव मार्गावरील दुसरा व्हिस्टाडोम कोच १५ सप्टेंबर २०२२ पासून तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आला.

या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये दि. २६ जून २०२१ पासून हे डबे सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दि. १५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन व्हिस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला जोडण्यात आले. २०२१ आणि प्रगती एक्सप्रेसमध्ये दि. २५ जुलै २०२२ पासून तसेच पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये दि. १० ऑगस्ट २०२२ पासून एक व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे.

व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छतासोबतच रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे, सिरॅमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्ये असून व्ह्यूइंग गॅलरी आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news