उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या वाहनाला अपघात | पुढारी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या वाहनाला अपघात

मुंबई, पुढारी ऑनलाईन:  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन सामंत यांच्या गाडीवर आदळल्याने अपघात झाला. या अपघाता सामंत यांना मुका मार लागला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

सामंत हे मुंबईमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला. उदय सामंत यांच्या विशेष सुरक्षा पथकातील गाडीचा ब्रेक फेल झाला. ही गाडी उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली. या अपघातात उदय सामंत यांना मुका मार लागला. यावेळी या गाडीत उदय सामंत एकटेच होते.
दोन गाड्यांच्या अपघातात सामंत यांचे सुरक्षा अधिकारी जखमी झाले. त्यांना मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

Back to top button