Katrina Kaif -Vicky Kaushal : कॅटरिनाच्या लग्नाला सलमान खान जाणार?, चर्चेला उधाण - पुढारी

Katrina Kaif -Vicky Kaushal : कॅटरिनाच्या लग्नाला सलमान खान जाणार?, चर्चेला उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड अभिनेत्री कॅटरिना कैप (  Katrina Kaif ) आणि विक्‍की काैशल (  Vicky Kaushal ) यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. तसेच या दोघांच्या लग्नामध्ये काेणते बॉलीवूड स्टार येणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या लग्नाला कॅटरिना कैप एक्स बॉयफ्रेंड, अभिनेता सलमान खान येणार का नाही, या चर्चेला उत आला हाेता.आता या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. कॅटरिनाच्‍या लग्‍नाला सलमान जाणार की नाही हे स्पष्ट झालं आहे.

कॅटरिना कैप (  Katrina Kaif ) आणि विक्‍की काैशल (  Vicky Kaushal ) यांच्या लग्नातील येणाऱ्या पाहुण्यांची यादी समोर आली आहे. राजस्थानमध्ये ९ डिसेंबर रोजी या दोघांच लग्न होणार आहे. या लग्नासाठी बॉलिवूडचे बडे स्टार्स येणार आहेत.

या स्टार्संना केलं आमंत्रित

कॅटरिना कैप (  Katrina Kaif ) आणि विक्‍की काैशल (  Vicky Kaushal ) यांच्या लग्नासाठी अनेक मोठ्या स्टार्संना आमंत्रित करण्यात आले आहे. यात आलिया भट्ट, करण जोहर, सलमान खान, कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

हे स्टार्स लग्नात सामील होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. बोस्को हे कॅटरिना कैपचे जवळचे मित्र आहेत. ते लग्नामध्ये उपस्थित असतील, अस मानलं जातं आहे. करण जोहरही सामील होणार आहेत. कॅटरिना कैप एक्स बॉयफ्रेंड आणि जवळचा मित्र सलमान खानच्या उपस्थितीवर सस्पेन्स कायम आहे.

Katrina Kaif हिच्या लग्नात सलमान खान येणार का?

Katrina – Vicky यांच्या लग्नाच्या तारखेच्या आसपास सलमान खानने रियाधमध्ये दंबग टूर आहे. कार्यक्रमाची तारीख 10 डिसेंबर आहे. दबंग टूरसाठी सलमानची कमिटमेंट पक्की आहे. त्यामुळे तो लग्न आणि दौरा कसं मॅनेज करतो हे पहावे लागेल. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींशिवाय कॅटरिना आणि विक्‍कीचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. राजस्थानमध्ये ७ ते ९ डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा होणार आहे. यानंतर हे कपल मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी देणार आहे. ज्यामध्ये फिल्मी जगतातील मोठे स्टार्स सहभागी होणार आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button