सरकारला फक्त शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सिद्ध करायचे : मल्लिकार्जुन खर्गे | पुढारी

सरकारला फक्त शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सिद्ध करायचे : मल्लिकार्जुन खर्गे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेती कायदे रद्दबाबत विधेयक, २०२१ वर चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. परंतु हे विधेयक घाईघाईने लोकसभेत मंजूर करून, सरकारला फक्त ते शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सिद्ध करायचे आहे, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली आहे. विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्यता आहे. वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द केले असले तरी शेतमालाला किमान हमीभाव देण्याच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा निर्धार काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केला आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सोमवारी लोकसभेत कृषी कायदे निरसन विधेयक २०२१ सादर केले. यानंतर काही वेळातच ते मंजूर झाले. यावेळी विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, यावेळी विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

हेही वाचलत का?

Back to top button