ब्रेकिंग - विजयपूरजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू | पुढारी

ब्रेकिंग - विजयपूरजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा

विजयपूरजवळील एसटी आणि फॉर्च्युनर गाडीची रविवारी समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नांदणीचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला. विजापूर पासून पुढे 14 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली.

या अपघातात सुरवसे यांच्यासह इतर आणखीन तीन जणांचा मृत्यू झाला असून त्या तीन जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये एक जण वाहन चालक असून हा राजूर मधील असल्याचे समजते. तर इतर दोघे तेरामैल येथील असल्याची चर्चा होती.

omicron corona : कोरोनामुळे १५ डिसेंबर सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान सेवेला लागणार ब्रेक?

ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याणच्या जवळपास घडली. मृत चिदानंद सुरवसे (वय 47) यांची फॉर्च्युनर गाडी एम एच 13 सी एस 3330 ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक के ए 22 एफ 2198 ला धडकली. त्यानंतर उलटून तिचा चक्काचूर झाला.

या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारही मृतदेह विजयपूर मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले.
घटनेची माहिती मिळताच चिदानंद सुरवसे यांचे कुटुंबीय ताबडतोब विजयपूर कडे रवाना झाले आहेत.

चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. नांदणीचे ते अनेक वर्षे सरपंच राहिले आहेत.

हेही वाचा

Back to top button