परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा परळी वैजनाथ तालुक्यातील जिरेवाडी येथील जागृत देवस्थान भगवान श्री सोमेश्वराचा पालखी सोहळा मोठ्या ऊत्साहाने प्रभू वैद्यनाथाच्या भेटीला आला. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत झाले. अनेक वर्षापासुनची परंपरा असलेला हा पालखी सोहळा अतिशय भव्यदिव्य स्वरुपात निघाला.
या पालखी सोहळ्यात भजनी मंडळी, कलशधारी महीला, शाळकरी मुलांचे टिपरी आणि लेझीम पथक यांसह गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी सोमेश्वर मंदीर जिरेवाडी येथुन पालखीचे प्रस्थान होउन हा पालखी सोहळा जलालपूर – शिवाजी चौक – एकमिनार चौक – स्टेशन रोड – बाजार समिती – टॉवर – जगमिञ नागा मंदीर मार्गे वैद्यनाथ मंदीर येथे दुपारी पोहोचला. ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले तसेच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान माजी मंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी पालखीत सहभागी होउन सोमेश्वराचे दर्शन घेतले.
हेही वाचा :