डिप्रेशनमधून बाहेर पडून श्रेयस अय्यर कसा बनला शतकवीर | पुढारी

डिप्रेशनमधून बाहेर पडून श्रेयस अय्यर कसा बनला शतकवीर

पुढारी ऑनलाईन डेस्क; कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टीम इंडियासाठी कसोटी पदार्पणातच शतक झळकावलं. श्रेयसनं १५७ चेंडूत शतक पूर्ण केले. यामुळे श्रेयस कसोटी पदार्पणात शतक पूर्ण करणारा १६ वा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी पृथ्वी शॉने अशी कामगिरी केली होती. तसेच ऑक्टोबर २०१८ नंतर प्रथमच भारताला कसोटी पदार्पणात शतकवीर मिळाला आहे. श्रेयसच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याचा आतापर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे…

एक आठ वर्षाचा मुलगा, भारतीय जिमखाना संघाच्या वतीने तो हातात बॅट घेऊन मैदानात उतरतो. त्याच्या बॅटने तो इतिहास घडवतो. ४६ चेंडूत शतक मारतो. सगळ्या मुलांच्या स्वप्नांसारख त्याचही स्वप्न भारतीय क्रिकेट संघात खेळण्याच असतं. तो हा इतिहास रचत असताना षटकार आणि चौकारांची बरसात करतो. सगळ्या मैदानात त्याची वाहवा होते. तो आठ वर्षाचा मुलगा म्हणजे श्रेयस अय्यर.

श्रेयस अय्यरच्या या यशाने घरी आनंदी होतात. या यशामुळे श्रेयसला घेऊन त्याचे वडील संतोष अय्यर त्याला शिवाजी पार्क येथील जिमखान्यात घेऊन जातात. पण त्याला तो फक्त ११ वर्षाचा असल्याच सांगून परत पाठवण्यात येते. यानंतर श्रेयसचे वडिल त्याला वरळी स्पोर्टसं क्लबमध्ये पाठवतात. एक तिकडे प्रॅक्टीस करुन झाल्यानंतर श्रेयस अय्यरने शिवाजी पार्कातील जिमखान्यात प्रवेश घेतला. शिवाजी पार्कमध्ये त्याची आणि प्रवीण अमरे यांची भेट होते.

श्रेयस अय्यरला क्रिकेटमध्ये चमकला तो फक्त प्रविण अमरे यांच्यामुळेच. त्यांनी भारतीय क्रिकेटला अजिंक्य रहाणे आणि रॉबिन उथप्पा यांच्यासारखे खेळाडू दिलेत.

वर्ष २००९

ज्युनिअर क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरसाठी वर्ष २००९ वाईट गेलं होतं. वयाच्या १६ व्या वर्षी चांगला खेळ त्याच्याकडून होत नव्हता. त्याला चाचण्यांमध्ये नाकारण्यात आलं होतं. त्यावेळी श्रेयसला वाटलं आता क्रिकेट आपल्या हातातून जात आहे. ते दिवस अय्यरच्या आयुष्यातील वाईट होते. तो या गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता. यावेळी त्याच्या वडिलांनी म्हणजेच संतोष अय्यर यांनी श्रेयसला डिप्रशनमधून बाहेर काढण्यास प्रयत्न केले. संतोष अय्यर यांच्यामुळेच भारतातला श्रेयस सारखा खेळाडू मिळालाय.

पुढं श्रेयस मुंबई अंडर-19 संघाचा कर्णधार झाला. यानंतर त्याची श्रेयसचीही भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली. 2014 साली UAE मध्ये झालेल्या U-19 विश्वचषक स्पर्धेत श्रेयस अय्यरने तीन सामन्यांत दोन अर्धशतकांच्या मदतीने १६१ धावा केल्या होत्या. अंडर-19 विश्वचषकाव्यतिरिक्त श्रेयस त्याच वर्षी यूके दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात त्याने तीन सामने खेळले. इथून त्याचा आलेख चढता राहीला.
श्रेयस अय्यरने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. अय्यरने सर्वाधिक १३२१ धावा केल्या. त्याने आणखी ९५ धावा केल्या असत्या तर व्हीव्हीएसने लक्ष्मणचा एका सीझनचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला असता. त्याने मुंबईला 41वा रणजी करंडकही मिळवून दिला.

१ नोव्हेंबर २०१७

या दिवशी श्रेयसला पहिल्यांदा भारताची कॅप मिळाली. त्याच न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पदार्पण झालं. पण त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये, श्रेयसने श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात 9 धावा केल्या. पण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 70 चेंडूत 88 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. आजच्या न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यात त्याने अजुन एक रेकॉर्ड केलं आहे. श्रेयसनं १५७ चेंडूत शतक पूर्ण केले. यामुळे श्रेयस कसोटी पदार्पणात शतक पूर्ण करणारा १६ वा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी पृथ्वी शॉने अशी कामगिरी केली होती. तसेच ऑक्टोबर २०१८ नंतर प्रथमच भारताला कसोटी पदार्पणात शतकवीर मिळाला आहे.

हेही वाचलत का?

Back to top button