राशिभविष्य (दि. २५ नोव्हेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. २५ नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – कौटुंबिक प्रश्न सोडवण्यात दिवस जाईल. चुकांबद्दल पश्चातापाची वेळ येईल. पोटासंबंधित तक्रारी संभवतात. अनावश्यक खर्च होईल. संवाद महत्त्वाचा आहे.

राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आत्मविश्वास निर्माण होईल. नवे धोरण आखाल. नव्या संधी चालून येतील. आर्थिकद़ृष्ट्या प्रगतिकारक दिवस.

राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

मिथुन – मनामधे विकल्प निर्माण होतील. सावधपणे प्रतिक्रिया द्या. वादविवादापासून दूर राहावे. आत्मचिंतनाची गरज आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.

राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – सुवार्ता कानावर येईल. वस्त्र, अलंकार खरेदीचे योग. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. मित्रमंडळींबरोबर सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल.

राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – ईर्ष्या निर्माण होईल. जवळच्या लोकांबरोबर संबंध बिघडण्याची शक्यता आहे. गैरसमजातून वादाची शक्यता. परावलंबी स्वभावामुळे मनःस्ताप होईल.

राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – पती-पत्नींमधील वाद मिटतील. वैवाहिकद़ृष्ट्या सौख्यकारक दिवस. व्यावहारिक संतुलन साधाल. व्यावसायिक भरभराट होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. कुटुंबात आनंददायी घटना घडेल. कामांची जबाबदारी वाढेल. मान-सन्मान होतील. प्रतिष्ठा वाढेल.

राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – द्विधा मनःस्थिती होईल. दवाखान्यासाठी खर्च होईल. सरकारी कर थकल्याने अडचणी निर्माण होतील. श्वसनासंबंधित आजार उद्भवतील. काळजी घेणे आवश्यक आहे.

राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – आरोप-प्रत्यारोप होतील. मानहानीचे प्रसंग येतील. जुने आजार उद्भवतील. मनःस्वास्थ्य बिघडेल. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्याल. आपल्याला जोडीदाराची साथ लाभेल. आपापसातील मतभेद दूर होतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल.

राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – मनोइच्छित सर्व गोष्टी पूर्ण होण्याचा दिवस. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल. सहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल. आत्मविश्वास वाढेल.

राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. संयमाने वागावे लागेल.

Back to top button