मुंबईत भाजप- मनसे येणार एकत्र ? ; राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट | पुढारी

मुंबईत भाजप- मनसे येणार एकत्र ? ; राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट

मुंबई, पुढारी ऑनलाईन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्याने बांधलेल्या शिवतीर्थ या घरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. ही भेट कौटुंबीक स्वरुपाची असली तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असून आमागी निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे.

मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या असून भाजप आणि शिवसेना असा सामना होण्याची शक्यता आहे. मात्र, मागील निवडणुकीत सर्व ताकद लावूनही भाजपला अपयश आले होते. त्यामुळे यावेळी मात्र, मनसेशी युती करण्याची शक्यता आहे.

भाजप आणि मनसे यांच्यामध्ये युती होणार यावर फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट म्हणजे शिक्कामोर्तब मानले जात आहे. दोन्ही पक्षांकडून या भेटीविषयी जाहीर चर्चा करण्यात आलेली नाही ही भेट अनौपचारिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप असून या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत करत आहेत. त्या दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. याआधी भाजपचे आमदार आशिष शेलार , प्रसाद लाड तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी भेट घेतली होती.

राज ठाकरे आगामी निवडणुकीत भाजपसोबत गेल्यात त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसेल असे मानले जाते. मात्र, महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजपलाही कडवे आव्हान ठरू शकते. त्यामुळे या युतीबाबत अधीकृत माहिती समोर आली नसली तरी त्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button