Sexual Assault : लैंगिक शाेषणाच्‍या आराेपानंतर गायब झालेली चीनची टेनिसस्‍टार म्‍हणाली. .. | पुढारी

Sexual Assault : लैंगिक शाेषणाच्‍या आराेपानंतर गायब झालेली चीनची टेनिसस्‍टार म्‍हणाली. ..

पुढारी ऑनलाईन डेस्क

चीनची स्टार टेनिस खेळाडू पेंग शुगाईने चीनच्या माजी उपपंतप्रधान प्रिमीयर झांग गाओली यांनी सेक्ससाठी जबरदस्ती केल्याचाआरोप केला आहे. गाओली यांच्याशी रिलेशनशीमध्ये असताना त्यांनी अनेकदा सेक्ससाठी जबरदस्ती ( Sexual Assault ) केल्याची पोस्ट तिने सोशल मीडियावर केली. त्यानंतर पेंग गायब असून त्याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Sexual Assault : २ नाेव्‍हेंबर राेजी केला हाेता आराेप

२ नोव्हेंबर रोजी Weibo पोस्‍ट करून पेंग हिने ऑन ऑफ रिलेशनशिपमद्ये गाओली यांनी सेक्ससाठी जबरदस्ती केल्याचा दावा केला. ही पोस्ट काही मिनिटांत डिलीट केली मात्र, त्याचे स्क्रीन शॉट फिरत आहेत. शनिवारी चीनचा सरकारी चॅनेलवर पेंग शुगाई हिचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून, यामध्‍ये ती एका रेस्टॉरंटमध्ये हसत जेवण घेत असल्याचे दिसून येत आहे. पेंग हिने एक पोस्ट करून मी गायब नसून सुरक्षित आहेत. घरात आराम करत आहे, असे सांगितले होते.

काय म्हणाली पेंग ?

३५ वर्षीय पेंग महिला डबल टेनिसमधील स्टार खेळाडू आहे. २०१३ चे विंबल्डन आणि २०१४ ची फ्रेंच ओपन स्पर्धा तिने जिंकली आहे. पुढील वर्षी ४ फेब्रुवारी रोजी बिजींगमध्ये सुरू होणाऱ्या विंटर गेम्सआधी तिचे गायब होणे हे स्कँडल मानले जात आहे. २ नोव्हेंबर रोजी तिने एक पोस्ट लिहिली असून झांग यांच्यावर आरोप केला आहे. वारंवार नकार देऊनही तीन वर्षांपूर्वी सेक्साठी त्‍यांनी माझ्यावर दबाव टाकला. त्यांनी वारंवार तसे केले. मी नकार देऊनही सेक्ससाठी माझ्‍यावर सक्‍ती करण्‍यात आली, असा आराेप या पाेस्‍टमधून करण्‍यात आला हाेता.  ही पोस्ट काही वेळाने डिलिट करण्‍यात आली हाेती. मात्र, त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत.

व्हाइस प्रीमियर झांग गाओली जवळपास तीन वर्षे मला आपल्या घरी घेऊन जात होते. ते आपल्या खोलीत घेऊन जात आणि माझ्याशी सेक्स करण्याचा प्रयत्न करत असत. मला अजूनही विश्वास बसत नाही की, या सर्व  प्रकाराला त्‍यांच्‍या बायकोचेही समर्थन हाेते. आम्ही सात वर्षांपूर्वी सेक्स केला. त्यानंतर ते स्टँडिंग कमिटीत गेले. बिजींगला गेल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्कही केला नाही. तुम्ही माझा तिरस्कार करता, असे म्हणालात. मी प्रचंड घाबरली होते. मी ही भावना सात वर्षे उराशी बाळगून होते, की मी सेक्स केलाय. तुम्ही निघून गेल्यावर तुमची पत्नी मला बरच काही बोलल्या. मी तुमचा उपयोग वैयक्तिक करणांसाठी केला नाही. मी माझ्या आईलाही हे सांगू शकले नाही. तुम्ही मला सांगितले होते की, आपण रजिस्टर मॅरेज करू; पण तुम्ही गायब झालात. तुम्ही एका मुलीचे वडील आहात. माझ्या जागी तुमची मुलगी असती तर ? तुम्ही जे काही केले त्यानंतर कुणी आपल्या आईसमोर शांतपणे जाऊ शकते का?, असे सवालही तिने केले हाेते.

‘ती पोस्ट माझ्या परवानगीशिवाय प्रसिद्ध करण्‍यात आली’

चीनचे सरकारी चॅनेल सीजीटीएने नुकतेच पेंग शुआई हिचे एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘ती पोस्ट माझी नव्हती. ती माझ्या परवानगीशिवाय प्रसिद्ध करऱ्यात आली होती. लैंगिक शोषणाच्या आरोपात तथ्य नाही. ती बातमी खरी नाही. मी गायब झाले नाही, माझ्या घरात आराम करत आहे.’ असे तिने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button