PM Modi UP visit : मोदी आलेत, बाल्कनीत दारात, खिडक्यांवर कुणीही कपडे वाळत घालू नका | पुढारी

PM Modi UP visit : मोदी आलेत, बाल्कनीत दारात, खिडक्यांवर कुणीही कपडे वाळत घालू नका

लखनौ, पुढारी ऑनलाईन

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरत असून येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे PM Modi UP visit आत्तापासूनच सुरू झाले आहेत. १९ नोव्हेंबर रोजी डीजीपी परिषदेसाठी नरेंद्र मोदी लखनौला गेले असून दारात, गॅलरीत किंवा खिडक्यांवर कुणीही कपडे वाळत घालू नका, अशा सूचना पोलिसांनी नागरिकांना दिल्या आहेत.

पोलिसांनी काढलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची खिल्लीही उडविली जात आहे.

तीन दिवसीय या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पोलीस महासंचालक, डीजीपींसह मोठे अधिकारी उपस्थित आहेत. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

लखनौ येथील शहीद पथावर असलेल्या पोलिस मुख्यालय सिग्नेचर बिल्डिंगमध्ये ही परिषद सुरू आहे. त्यामुळे सिग्नेचर इमारतीच्या आसपास असलेल्या अपार्टमेंटमधील नागरिकांनी १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान बाल्कनीत, खिड्यांवर अथवा दारात कपडे वाळत घालू नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

PM Modi UP visit :  कडेकोट सुरक्षा

पंतप्रधान मोदी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गोमतीनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी परिसरातील सर्व इमारतीमधील रहिवाशांना हे पत्र पाठवले आहे. हे पत्र हाती पडताच ते सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यनातंर नेटकऱ्यांनी या पत्राची खिल्ली उडवली आहे.

१९ ते २१ तारखेदरम्यान नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यातील अनेक सूचना गंमतीदार असल्याने त्यावरुन सोशल मीडियात खिल्लीही उडविली जात आहे.

कपडे वाळत घालू नका, काहीही लटकवून ठेऊ नका, आपल्या इमारतीमध्ये नवीन कुणी रहायला आल्यास तत्काळ पोलिसांना कळवा, अशा सूचना केल्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button