'हे' सेलिब्रिटी झाले सरोगसी-आयव्हीएफच्या मदतीने आई-बाबा

Bollywood surrogacy parents

पुढारी ऑनलाईन डेस्क :

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा (Preity Zinta). नुकतीच ती सरोगसीच्या मदतीने  (Bollywood Surrogate Parents) दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. तिच्या या जुळ्या मुलांची नावे जय आणि जिया असून, तिने ही गुड न्यूज आपला आणि आपल्या पतीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना दिली. तिच्यावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Bollywood surrogacy parents बॉलिवूड सेलिब्रिटी

प्रिती झिंटा ही फक्त एकटीच अभिनेत्री नाही जी सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. या अगोदरही अनेक बॉलिवूड अभिनेते-अभिनेत्री सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा (Bollywood Surrogate Parents) झाले आहेत. बॉलिवूड मधील प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान आणि पती शिरिष कुन्द्रा आयव्हीएफच्या मदतीने आई-बाबा झाले. ११ फेब्रुवारी २०१८ मध्ये फराह वयाच्या ४३ वर्षी ३ मुलांची आई झाली.
बॉलिवूड अभिनेता सोहेल खान आणि सीमा यांनी आपल्या निर्वान या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर दुसऱ्या बाळाचा विचार केला. पण नैसर्गिकरित्या बाळ जन्माला घालता येत नाही लक्षात आल्यावर त्यांनी आयव्हीएफचा Bollywood Surrogate Parents विचार केला. त्यांनी लग्न झाल्याच्या १३ व्या वर्षी त्यांनी २०११ साली योहान या बाळाला जन्म दिला.
मिस्टर फरफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव हे ५ डिसेंबर २०११ साली सरोगसीतून आई-बाब झाले. त्यांनी आपल्या बाळाचे नाव आजाद ठेवले आहे. आमिर खान आणि त्याची पहिला पत्नी रीना दत्ता यांना २ मुले आहेत.
दिग्दर्शक करण जोहर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमी चर्चेत असतो. तो आपल्या सेक्स लाईफ बद्दल खुलेआम बोलत असतो. आज तोही यश आणि रूही या सरोगसी मुलांचा बाप आहे.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांचा तिसरा मुलगा अबराम हाही सरोगसीच्या माध्यमातून झालाय.
निर्माती एकता कपूर ही सुद्धा सरोगसीच्या साहाय्याने आई झाली आहे.
 
हेही वाचा 
Exit mobile version