पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मालिकेतील पाचवा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने १६० धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर १६१ धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारताकडून श्रेयसकडून अय्यरने ३७ चेंडूमध्ये ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. जितेश शर्माने २४ आणि अक्षर पटेलने ३१ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्र्लियन गोलंदाजीने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताला १६० धावांपर्यंत रोखण्यात यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरडॉर्फ आणि बेन द्वारशुईस यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. तर अरोन हार्डी, नेथन ईलीस आणि तनवीर संघा यांनी प्रत्येकी १ विकेट पटकावली.