झारखंडमध्‍ये ड्रग्‍ज रॅकेट उघड, महिला माॅडेलला अटक | पुढारी

झारखंडमध्‍ये ड्रग्‍ज रॅकेट उघड, महिला माॅडेलला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क

झारखंडमध्ये ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिला मॉडेलला अटक केली आहे. तिने अनेक तरुणांना प्रेमाच्‍या जाळ्यात ओढायचे नंतर त्‍यांना  ड्रग्ज विक्रीस भाग पाडले, असा आरोप स्‍थानिक पोलिसांनी केला आहे.

ज्योती नावाची एक मॉडेल रांची येथे ड्रग्ज चा व्यवसाय करत होती. पहिल्यांदा ती मॉडेल तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. आणि त्यांच्याकडून ड्रग्जचा व्यवसाय करुन घेत होती. पोलिसांनी सांगितले की, सुखदेवनगर पोलिस ठाणे क्षेत्रात ड्रग्जची विक्री हाेत असल्याची माहिती मिळाली होती. यावरुनच पोलिसांनी कारवाई केली होती. यावेळी मॉडेससह दोघांना अटक केली आहे. टोळीचा म्होरक्या घटनास्थळावरून पळून गेला.

अटक करण्यात आलेल्या मॉडेलचे नाव ज्योती भारद्वाज असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या अडीच वर्षांपासून ती दिल्लीत राहात होती, मात्र सध्या ती रांचीला आली होती. पोलिसांनी मॉडेलला विद्यानगर येथून अटक केली. त्याच्याकडून 28 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button