सातारा : पेढेवाल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी | पुढारी

सातारा : पेढेवाल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी

सातारा; पुढारी वृत्तसेवा

सातार्‍यातील पेढे व्यावसायिकाला गेल्या 8 दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल येत असून 30 लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिस मुख्यालयात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.

प्रशांत मोदी असे तक्रार अर्ज केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांना इंटरनॅशनल कॉल येत आहेत. 30 लाख रुपये दे; अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन, अशी धमकी देण्यात आली. सुरुवातीला मोदी यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यांना रात्री-अपरात्री देखील फोन येण्याचे तसेच मेसेज करून वारंवार 30 लाख रुपये देण्यासाठी धमकावले गेले. सुमारे 10 ते 12 कॉल, मेसेज आल्याने मोदी यांनी पोलिस मुख्यालयात याबाबत ई-मेल करून तक्रार अर्ज पाठवला.

या तक्रार अर्जात आलेले फोन नंबर, मेसेज याचे स्क्रीनशॉटही जोडले आहेत. तक्रार अर्जात म्हटले आहे की, या धमकीमुळे जीविताला धोका निर्माण झाला आहे. दोन वेगवेगळ्या नंबरवरून एकाच प्रकारची धमकी दिली जात आहे. सातारा पोलिसांना मेल पाठवल्यानंतर मंगळवारी प्रशांत मोदी यांनी सायबर पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सातारा पोलिसांनी सर्व माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली असून सर्व बाजूने तपास सुरू आहे. दरम्यान, सातार्‍यातील व्यावसायिकाला 30 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल होत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचलत का?

 

Back to top button