Weather update : पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज | पुढारी

Weather update : पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क

Weather update : पुढील तीन दिवस कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

१७ नोव्हेंबर

कोकण, गोव्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटाची शक्यता आहे. मराठवाड्यासह विदर्भात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१८ नोव्हेंबर

१८ तारखेलाही गोव्यासह कोकणात तुरळक पावसाचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता आहे.

१९ नोव्हेंबर

१९ नोव्हेंबरला गोवा, कोकणसह मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसासह, मेघगर्जसह विजांचा कडकडाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

२० नोव्हेंबर

२० नोव्हेबर रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather update : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सात राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. १७ आणि १९ तारखेला तेलंगणाच्या समुद्र किनाऱ्या लगतच्या भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचलत का?

Back to top button