Dr.Amol Kolhe : विक्रम गोखलेंच्‍या विधानांचा डाॅ. अमाेल काेल्‍हेंनी घेतला समाचार | पुढारी

Dr.Amol Kolhe : विक्रम गोखलेंच्‍या विधानांचा डाॅ. अमाेल काेल्‍हेंनी घेतला समाचार

मुंबई, पुढारी ऑनलाईन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केल्यानंतर आता फिल्म इंड्रस्ट्रीसह राजकीय व्यक्तींसह डाॅ. अमाेल काेल्‍हे  ( Dr.Amol Kolhe) यांनीही समाचार घेतला आहे. गोखले यांनी या देशात भगवे रक्त आहे, असा उल्लेख केला. मग रुग्णालयात आलेल्यांना भगवे रक्त असेल तरच उपचार करणार का? असा खडा सवाल केला आहे.

Criticism of Dr. Amol Kolhen on Vikram Gokhale’s statement

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यात कंगना रनौतच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. त्यावरून त्यांना सोशल मीडियातून जोरदार ट्रोल केले. गोखले यांना अतुल कुलकर्णी यांच्यासह काही अभिनेत्यांनी सुनावले आहे. त्यात आता खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Dr.Amol Kolhe) यांनीही त्यांना धारेवर धरले आहे.

‘कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्ण मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार, जर हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार? असा सवाल केला आहे.
मानवता हीच त्यापलिकडची गोष्ट आहे, वसुदैवं कुटुंबकम ही आपल्या संतांची शिकवण, परंपरा आहे. एकीकडे तुम्ही संस्कृतीचे गोडवे गात असताना दुसरीकडे वसदैवं कुटुंबकमला तिलांजली देता, असेही अमाेल काेल्‍हे
(  Amol Kolhe ) म्हणाले.

काय म्हणाले हाेते विक्रम  गोखले?

७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने पत्रकारांशी विक्रम गोखले बोलत होते. यावेळी त्‍यांनी कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास बरं होईल, असंही ते म्हणाले. ‘कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले’, असा गंभीर आरोपही विक्रम गोखले यांनी केला.

‘कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवत देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे. राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे, काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्दैव आहे. बाबरापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही,’ असेही विक्रम गोखले म्‍हणाले.

हेही वाचलं का? 

Back to top button