Aishwarya Narkar : तुझ्या रुपात चांदणं पडलंय, ऐश्वर्यावरून नजर हटेना | पुढारी

Aishwarya Narkar : तुझ्या रुपात चांदणं पडलंय, ऐश्वर्यावरून नजर हटेना

पुढारी ऑनलाईन :

अनेक कसदार भूमिका साकारून मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने (Aishwarya Narkar) नेहमीचं आपलं वलय निर्माण केलंय. अभिनयाच्या जोडीबरोबरचं तिचं सौंदर्याचं वर्णन किती करावं. तिच्या अप्रतिम सौंदर्याचे गोडवे खुद्द तिचे चाहते गाताहेत. तुझ्या रुपात चांदणं पडलंय म्हणत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. (Aishwarya Narkar)

ऐश्वर्या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीचं सुंदर फोटो शेअर करत असते. या वयातची तिचं सौंदर्य तसूभरदेखील कमी झालेलं नाही. तिने जीन्सवर ब्लॅक कलर टी-शर्ट घातलाय. त्याचबरोबर तिच्या मोकळ्या केसांमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसतंय.

एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर नवनव्या लूकमध्ये फोटो शेअर करत असते. या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते.
काही महिन्यांपूर्वी तिने पांढऱ्या रंगाच्या साडीतील काही अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. त्यातील तिचा नवा लूक लक्षवेधी ठरला होता.

  • नव्या ऐतिहासिक मालिकेत झळकणार

ऐश्वर्या  ऐतिहासिक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या हिंदी मालिकेत दिसणार आहेत. ‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ असं या मालिकेचं नाव आहे. यामध्ये त्या राधाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘काशीबाई बाजीराव बल्लाळ’ या हिंदी मालिकेचे प्रोमोज टीव्हीवर पाहायला मिळताहेत. या ऐतिहासिक मालिकेची प्रेक्षकांना खुपच उत्सुकता लागून राहिली आहे. याच मालिकेत ऐश्वर्या नारकर राधाबाईंची भूमिका साकारणार आहे.

नारकर यांनी यापूर्वी ‘स्वामिनी’ या मराठी मालिकेत पेशवे घराण्यातील गोपिकाबाई यांची व्यक्तिरेखा साकारली होती. आता पुन्हा एखादा त्या पेशवे घराण्यातील व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहेत.

त्याचबरोबर, त्यांनी स्मॉल स्क्रिनवरील श्रीमंता घरची सून या मालिकेत सासूबाईंची भूमिका साकारली होती.

 

Back to top button