काश्मिरमध्ये चकमकीत एक अतिरेकी ठार | पुढारी

काश्मिरमध्ये चकमकीत एक अतिरेकी ठार

श्रीनगर, पुढारी ऑनलाईन

दक्षिण काश्मिरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी एका अतिरेक्याला ठार करण्यात यश मिळविले आहे (अतिरेकी ठार). गेल्या दोन दिवसांपासून अतिरेक्यांशी सुरक्षा दलाची चकमक सुरू होती. मारल्या गेलेल्या अतिरेक्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला आहे. आत्तापर्यंत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

दक्षिण काश्मिरमध्ये कुलगाममधील मंजगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केला होता. पोलिसांच्या एका पथकाला त्यांनी लक्ष्य करत हल्ला केला. यात दोघेजण जखमी झाले होते. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर परिसराची नाकाबंदी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या परिसराला घेरले होते. त्यानंतर चकमक सुरू होती. तसेच श्रीनगरच्या सफाकदल परिसरात अतिरेक्यांनी सात ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ग्रेनेड हल्ला केला होता. बारीपोरा ईदगाह परिसरात असलेल्या सीआरपीएफ कँपच्या बाजुला हे ग्रेनेड पडले. त्यानंतर हा परिसरही सील करण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरेकी संघटनांनी एक हिटलिस्ट तयार केली असून खोऱ्यातील ९० हून अधिक लोकांची नावे आहेत. अतिरेक्यांच्या हिटलिस्टमध्ये काही पत्रकारांची नावेही आहेत. काश्मिरी पंडित समाजाची मोठी संस्था असलेल्या पनुन काश्मिर संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र रैना म्हणाले, गैरमुस्लिमांवरील हल्ले १९९० च्या दशकातील हल्ल्यांची आठवण करून देत आहेत. निशस्त्र लोकांना त्यांना धर्माच्या आधारावर मारले जात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काश्मिरी पंडितांनी स्थलांतर केले. काश्मिरी पंडितांची सुरक्षा हे सरकारचे प्राधान्य असायला हवे. (अतिरेकी ठार )

अतिरेकी ठार : लश्कर-ए-तैयबाचे अतिरेकी

दोन दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी एका अतिरेक्याला कंठस्नान घातले. श्रीगर शहरातील अल्पसंख्याक समुदायातील दोन शिक्षकांची त्यांनी हत्या केली होती. त्यानंतर मागील आठवड्यात नटिपोरा भागात चकमकीत लश्कर-ए-तैयबा चा एक अतिरेकी ठार झाला होता. शोपियां येथील आकिब हा २०२० पासून या संघटनेत काम करत होता. त्याच्याजवळून एके 47 रायफल, दोन मॅगेझीन आणि एक बॅग हस्तगत केली. एक अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याचाही आज सुरक्षा दलांनी खात्मा केला.

हेही वाचा: 

Back to top button