रियाज भाटी याचे राष्ट्रवादी, शिवसेनेशी संबंध; आशिष शेलार यांचा पलटवार | पुढारी

रियाज भाटी याचे राष्ट्रवादी, शिवसेनेशी संबंध; आशिष शेलार यांचा पलटवार

मुंबई, पुढारी ऑनलाईन

नवाब मलिक यांची आम्हाला काळजी वाटते. त्यांचे मानसिक संतुलन ठीक रहावे,  अशी अपेक्षा आहे. रियाज भाटी हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. त्याचे राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत, असा पलटवार भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला. दाऊदचा हस्तक आणि कुख्यात गुंड रियाज भाटी याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध होते. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात त्याला थेट प्रवेश दिला. तसेच कुख्यात गुंडांना विविध महामंडळांची पदे दिली ,असा आरोप राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्याला आशिष शेलार यांनी उत्तर दिले.

यावर बाेलताना  ते म्हणाले, ‘वाझे वसुली प्रकरणात रियाज भाटीचे नाव आले आहे. त्यानंतर रियाज भाटीचे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन गेले. त्यामुळे त्याला सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. वाझे प्रकरणात रियाज भाटीचे नाव आले आहे.त्यामुळे त्याला कस्टडीत घेतले तर अनेक बाबी समोर येतील त्यामुळे त्याला राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवले आहे.

अल्पसंख्याक नेत्यांना बदनाम करण्याचे मलिक काम करत

अल्पसंख्याक समाजातील लोकांना वेचून मलिक आरोप करत आहेत. हाजी अराफत आणि हैदरवर गुन्हे नाहीत. क्रिकेटच्या राजकारणात रियाज भाटीला कुणी आणले आहे. मुंबईतल अल्पसंख्याक नेत्यांना बदनाम करण्याचे मलिक काम करत आहेत. अल्पसंख्याक समाजाला नेस्तनाबूत करायचे आहे. मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आपल्यावरील आरोप समजत नाहीत. सरकार शहावली खान शिक्षापात्र गुन्हेगार आहे. त्याच्याशी त्यांचे व्यवहार झाले आहेत. सध्या त्यांच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत. तरीही गेली दोन वर्षे साधी एफआयरही नोंद केली नाही. त्यामुळे त्यांचे आरोप तथ्यहीन आहेत. मलिक यांच्यामुळेच शाहरूख आणि आर्यन अडचणीत आला आहे.’

हेही वाचलं का? 

Back to top button