पोलिस निरीक्षक महिलेसोबत रंगेहाथ सापडला; पत्नीनं बेदम चोपला | पुढारी

पोलिस निरीक्षक महिलेसोबत रंगेहाथ सापडला; पत्नीनं बेदम चोपला

पुढारी ऑनलाईन डेस्क

कानपूर मधील ग्वालटोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण कुमार यांना रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये महिलोसोबत पत्नीने रंगेहाथ पकडले. अरुण कुमार यांच्या पत्नीने दोघांनाही बेदम मारहाण केली. हॉटेल परिसरात एकच गोंधळ सुरु झाला.

सोमवारी पोलिस कमिश्नरांनी निरीक्षक अरुण कुमार यांना निलंबित केलं आहे. या प्रकरणाची चौकशी एसीपी कर्नलगंज हे करत आहेत. निरीक्षक अरुण कुमार यांच्या विरोधात यासारख्या अनेक तक्रारी आल्या आहेत. इन्स्पेक्टर अरुण कुमार ग्वालटोली ठाण्यात अतिरिक्त निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

रविवारी रात्री ग्वालटोली क्षेत्रात एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. त्यांच्यासोबत एक एक महिलाही होती. याची माहिती त्या निरीक्षक अरुण कुमार यांच्या पत्नीला मिळाली. रात्री उशीरा पत्नी त्या हॉटेलवर पोहोचली आणि निरीक्षक अरुण कुमार यांना रंगेहात पकडले.

प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे पोलिस आयुक्त असीम अरुण यांनी निरीक्षकाला निलंबित केले. एसीपी कर्नलगंज त्रिपुरारी पांडे यांनी सांगितले की, निरीक्षकाविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, इन्स्पेक्टरविरोधात अशा अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. सर्व तक्रारींचा तपासात समावेश केला जाईल.

बलात्काराचा गुन्हा दाखल

सुमारे पाच वर्षांपूर्वी एका महिलेने निरिक्षक अरुण कुमारवर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. नंतर हे प्रकरण मिटवण्यात आले. तो त्याच महिलेसोबत त्याच्या शासकीय निवासस्थानी राहतो अस सांगण्यात येत आहे. तिच्याशी लग्न केल्याचा दावा त्या निरिक्षकाने केला. अरुण कुमार हे मुळचे फिरोजाबादमधील सिरसागंजचे आहेत.

हेही वाचलत का?

 

Back to top button