‘या' अ‍ॅप मुळे तुमचे महिन्याला ३ हजार रुपये होणार कट; तुम्ही केलं आहे का डाऊनलोड? | पुढारी

‘या' अ‍ॅप मुळे तुमचे महिन्याला ३ हजार रुपये होणार कट; तुम्ही केलं आहे का डाऊनलोड?

पुढारी ऑनलाईन डेस्क

आजच्या काळात सायबर फसवणूक वाढली आहे. धोकादायक आणि Malware अ‍ॅप मुळे युजर्ससोबत फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. अ‍ॅपल आणि गुगल सातत्याने या प्रकारचे अ‍ॅप काढून टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी, हे सर्व असूनही अॅप स्टोअरवर या प्रकारची अ‍ॅप्स परत येत आहेत. प्रीमियम एसएमएस फ्रॉड स्कीममध्ये १५१ अ‍ॅप्स आहेत. UltimaSMS कॅम्पेनमध्ये SMS सर्विससाठी नोंदणी बनावट अ‍ॅपचा वापर करुन केली आहे.

लाखोंनी केले अॅप डाऊनलोड

जगभरात ८० पेक्षा जास्त देशात १ कोटी ५ लाख पेक्षा जास्त लोकांनी १५१ फ्रॉड अ‍ॅप्स डाऊनलोड केले आहेत. यात कस्टं किबोर्ड QR कोड स्कॅनर, व्हिडिओ आणि फोटो इडिटींग, कॉल ब्लॉक आणि गेम सहित अनेक अ‍ॅप्स असल्याचे भासवले जात आहे. या सर्व अ‍ॅप्सनी पोस्ट डाऊनलोड, एरिया कोड, भाषा निश्चित करण्यासाठी फोन लोकेशन, IMEI नंबर आणि फोन नंबर व्हेरिफिकेशन यासह समान पॅटर्न वापरला आहे.

फसवणूक कशी

या फ्रॉडमध्ये युजर्संना फोन नंबर आणि त्याच साइन-इन करण्यासाठी इमेल अ‍ॅड्रेससाठी वापर केला जातो. ही माहिती युजरच्या संमतीशिवाय प्रीमियम एसएमएस सेवेसाठी साइन अप साठी वापरली आहे. यासाठी सुमारे ३ हजार रुपये चार्ज प्रतिमहिना आकारले जातात.

युजर्सची फसवणूक केल्यानंतर अ‍ॅप काम करणे बंद करते. जर एखाद्या वापरकर्त्याने हे प्रोग्राम अनइंस्टॉल केले, तर त्यांना सदस्यत्व शुल्क आकारले जाते. ज्यासाठी त्यांनी साइन अप केले होते. या फसवणुकीसंबंधित असलेले सर्व १५१ अॅप्स अवास्टच्या अहवालात आहेत. हे युजर्सची त्यांच्या स्मार्टफोनमध्ये इनस्टॉल केले आहेत. जर तुम्ही देखील अशा प्रकारचे स्मार्टफोन अॅप्स इनस्टॉल केले असतील तर ते लगेच अनइंस्टॉल करा. आणि तुमचं बँक अकाऊंट तपासा.

हेही वाचलत का?

अंबाबाई मंदिर दक्षिणायन किरणोत्सव सोहळा

Back to top button