पंकजा मुंडे : ‘मोदी, शहा आणि जेपी नड्‍डा हेच माझे नेते’ | पुढारी

पंकजा मुंडे : 'मोदी, शहा आणि जेपी नड्‍डा हेच माझे नेते'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पंकजा मुंडे यांनी सुचक शब्दात भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे. ज्या दिवशी वाटेल या ठिकाणी राम नाही त्या दिवशी पाहू अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

पंकजा मुंडे यांनी समर्थकांनी दिलेले राजीनामे नामंजूर केले आहेत. दबावतंत्राचा वापर करायचा नसल्याचे त्या म्हणाल्या. शक्य आहे तोवर धर्मयुद्ध टाळणार असल्याचे त्या म्हणाल्या.

अधिक वाचा 

मोदी कॅबिनेटच्या जम्बो विस्तारामध्ये मुंडे भगिनींना स्थान न मिळाल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने बीडमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तथापि पंकजा मुंडे यांनी राजीनामे स्वीकारले नाहीत.

केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले.

पंकजा यांनी पीएम मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा हेच माझे नेते असल्याचे सांगितले. त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांचे नावच घेतले नाही.

अधिक वाचा 

आपली शक्ती कमी करण्याचा डाव सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

हा डाव पूर्ण होऊ द्यायचा नसल्याचे त्यांनी समर्थकांशी बोलताना सांगितले. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचे. ज्या दिवशी छत कोसळेल त्यादिवशी पाहू असे त्या म्हणाल्या.

पीएम मोदींनी आपल्याला कोणत्याही प्रकारे फटकारले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत शक्य आहे मी धर्मयुद्ध टाळण्याचे प्रयत्न करते.

आम्ही कोणालाही घाबरत नाही. मला स्वत:साठी काही नको असून मला तुमच्यासाठी हवं आहे. मी तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

Back to top button