शोएब अख्तर म्हणतोय, भारतीय खेळाडूंनी इन्स्टाग्रामवरती क्रिकेट खेळू नये | पुढारी

शोएब अख्तर म्हणतोय, भारतीय खेळाडूंनी इन्स्टाग्रामवरती क्रिकेट खेळू नये

पुढारी ऑनलाईन डेस्क

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2021 मध्ये भारतीय टीमची कामगीरी निराशाजनक सुरु आहे. विराट सेनेने काल झालेला न्यूझीलंड विरुध्दचा दुसरा सामनाही गमावला. तडाकेबाज असणाऱ्या भारतीय टीमच्या खराब कामगीरीवर टीका होत आहेत. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे.

शोएब अख्तर याने ही टीका युट्युबवरुन केली आहे. ”मॅच तर आपण बघितली. हिंदुस्थान टीमसाठी कठीण काळ येणार होता आणि ती आलीच आहे. त्यांची हार झाली आहे. ते खूप खराब खेळले आहेत. सामना पाहून वाटत नाही ते सामना खेळायला आले होते. असं वाटलं की, न्यूझीलंड सामना खेळायला आला होता.

याशिवाय त्यांनी भारतीय मीडियावरही सडकून टीका केली आहे. हिंदुस्थानची सरासरी कामगिरी. ते जितके बोलत होते आणि भारतीय माध्यमांनी संघावर जेवढे दडपण आणले होते, त्यामुळे ते अडकतील याची मला खात्री होती. अशी टीका अख्तरने मीडियावर केली.
भारतीय संघाच्या भवितव्याबद्दलही अख्तर बोलला. नाणेफेक जिंकली नाही. याशिवाय त्याने भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

अख्तरने इशान किशनला सलामीवर पाठवण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. अख्तरच्या मते, रोहित शर्माने डावाची सुरुवात करायला हवी होती. त्याचबरोबर त्याने पांड्याच्या गोलंदाजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तो म्हणाला, ‘शेवटी पांड्या गोलंदाजी करायला आला. त्याने आधी गोलंदाजी करायला हवी होती. अख्तरच्या मते, कालच्या सामन्यात भारतीय संघ कोणत्या धोरणाने खेळत होता, हे त्यांच्या समजण्यापलीकडचे आहे.

शोएब अख्तरच्या मते, अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. इथेही संघ हरला तर विराट सेनेसाठी फार वाईट होईल. ‘इन्स्टाग्रामवर क्रिकेट खेळणे सोडा आणि मैदानावर क्रिकेट खेळायला सुरुवात करा’, असा सल्ला त्याने खेळाडूंना दिला आहे.

हेही वाचलत का?

Back to top button