Love : आईशप्पथ! कोट्यधीशाची बायको रिक्षावाल्याला भुलली, ४७ लाख घेऊन पळाली - पुढारी

Love : आईशप्पथ! कोट्यधीशाची बायको रिक्षावाल्याला भुलली, ४७ लाख घेऊन पळाली

पुढारी ऑनलाईन डेस्क : भावड्या… प्रेम (Love) ही गोष्ट इतकी भारीय की, त्याच्यासाठी  पद, पैसा, प्रतिष्ठा, नाती, समाज सगळं साेडून व्‍यक्‍ती कोणत्याही थरालाही जाऊ शकतात. असाच एक प्रकार मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये घडलाय. त्याचं झालंय असं की, कोट्यधीशाची बायको चक्क एका रिक्षावाल्याबरोबर पळून गेली ना राव…

हा सगळा प्रकार नुकताच १३ ऑक्टोबरला घडलाय. इंदूरमधील खाजराना इलाक्यात हा सगळा प्रकार समोर आला. बिचाऱ्या कोट्यधीश पतीने पोलीस स्टेशनात पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.  नंतर यामागे नेमकं काय घडलंय हे समोर आलं. तर,त्‍याची बायको रिक्षावाल्याबरोबर पळून जाताना एक नाही, दोन नाही, तर तब्बल ४७ लाख रुपये घेऊन धूम ठोकलीय.

सगळी माहिती अशी…  रिक्षावाला कायम कोट्यधीशाच्या बायकोला घरी सोडायला यायचा. पण, १३ तारखेली ती घरी आलीच नाय. पतीनं घर सगळं चेक केलं तर लक्षात आलं की, घरातलं ४७ लाख रुपयही गायब झालेले त्याच्या लक्षात आलं.

आता हा माणूस उद्योगपती, त्यात घरची जमीन लई. त्यामुळं चिक्कार पैसा ओ… हा सगळा पैसा घरात असायचा. सध्या या अफालातून घडलेल्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत. जगावेगळा उद्योग करणारी उद्योगपतीची बायको आणि आपल्या प्रेमाच्या (Love) जाळ्यात कोट्यधीशाच्या बायकोला ओढणारा रिक्षावाला, यांना शोधण्यासाठी पाेलिस जीव तोडून प्रयत्न करताहेत.

या बहाद्दर रिक्षाचालकाचं नाव हाय इम्रान. त्याचं वय ३२ वर्ष हाय. तो खांडवा, जावरा, उज्जैन आणि रतलाम या गावात राहून आलेला हा पठ्ठ्या आहे, अशी पण माहिती समोर आलीय. या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्यात. अहो, सगळ्यात भन्नाट ही माहिती की, पोलीस धाडी टाकत असताना रिक्षावाल्याच्या मित्राच्या घरात ३३ लाख रुपये सापडल्यात. एकुणच या सगळ्या प्रकरणाने पाेलिसच चक्रावून गेले आहेत.

Back to top button