अनन्या पांडेच्या चौकशीनंतर ड्रग पेडलर एनसीबीच्या ताब्यात - पुढारी

अनन्या पांडेच्या चौकशीनंतर ड्रग पेडलर एनसीबीच्या ताब्यात

मुंबई ; पुढारी ऑनलाईन डेस्क

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खान, मूनमून धमेचा, अरबाज मर्चंट यांना अटक केल्यानंतर आता अभिनेत्री अनन्या पांडे हिची चौकशी सुरू असून एका ड्रग पेडलरला रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे ( ड्रग पेडलर एनसीबीच्या ताब्यात ).

आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणात एनसीबीन कडून (Narcotics Control Bureau- NCB) बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी करण्यात आली. यानंतर एनसीबीने  आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. एनसीबीने मुंबईमधून काल रात्री (२१ ऑक्टोबर) एका ड्रग्ज पेडलरला आपल्या ताब्यात घेतले आहे.

महत्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता

एनसीबीने ताब्यात घेतलेला हा ड्रग्ज पेडलर २४ वर्षांचा असून एनसीबीने ही कारवाई काल रात्री केली. ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. कोर्डिलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणातील हा ड्रग्ज पेडलर महत्त्वाचा संशयित असल्याचे एनसीबीने म्हंटले आहे. या ड्रग्ज पेडलर कडून महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता एनसीबीने व्यक्त केली आहे.

ड्रग पेडलर एनसीबीच्या ताब्यात : व्हॉट्सअॅपवरील  संभाषण

ताब्यात घेतलेल्या २४ वर्षीय ड्रग्ज पेडलरचे नाव ड्रग्जसंबंधित व्हॉट्सॲपवरील  संभाषणात याच नाव असू शकते ही शक्यताही एनसीबीने व्यक्त केली आहे.  आज रात्री (२२ ऑक्टोबर)  ड्रग्ज पेडलरची चौकशी एनीसीबीच्या कार्यालयात करण्यात येणार आहे.

 दोन दिवसांत  एनसीबीच्या सहा धाडी

या दोन दिवसांत मुंबई व परिसरात एनीसीबीने अमली पदार्थ प्रकरणाच्या अनुषंगाने सहा धाडी टाकल्या आहेत. आणखी काही नावे या मली पदार्थ प्रकरणात येण्याची शक्यता आहे.

 व्‍हॉटस ॲप चॅट उघड

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात  शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्‍या जामीन अर्जावर आज विशेष न्‍यायालयात सुनावणी झाली. यावेळी नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरोने (एनसीबी) आर्यन खानचे व्‍हॉटस ॲप चॅट ( Aryan Khan WhatsApp chats ) न्‍यायालयात सादर केले. हे ड्रग्‍ज विषयी असणारे चॅट आर्यन खान आणि नवोदित अभिनेत्रीमध्‍ये आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून आर्यन खानच्‍या अडचणीत वाढ होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

हा व्हिडिओ पहा :

पोटासाठी नाचतो मी पर्वा कुणाची? पुरूष लावणी कलावंताची कहाणी

 

Back to top button