‘घोटाळा सिद्ध; हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा’; ‘जयोस्तुते’चे कंत्राट रद्द | पुढारी

‘घोटाळा सिद्ध; हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा’; ‘जयोस्तुते’चे कंत्राट रद्द

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ग्रामपंचायतींचे टीडीएस रिटर्न भरण्याचे जयोस्तुते मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आलेले कंत्राट वादग्रस्त ठरल्यानंतर ते रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतल्यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी  किरीट सोमय्या यांनी  केली आहे.

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे टीडीएस रिटर्न भरण्यासाठी राज्यभरासाठी जयोस्तुते मॅनेजमेंट प्रा. लि. ही कंपनी निश्‍चित केली होती. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला या कंपनीला पैसे द्यावे लागणार होते. ही कंपनी मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित आहे.

या कंत्राटाच्या माध्यमातून दीड हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी ‘ईडी’कडेही तक्रार केली होती. मुश्रीफ यांनी त्यावर खुलासा करताना या कंपनीशी आपल्या जावयाचा काही संबंध नसल्याचे म्हटले होते. या कंपनीमार्फत टीडीएस रिटर्न भरण्याची कोणत्याही ग्रामपंचायतीवर सक्‍ती नाही. ते पूर्णपणे ऐच्छिक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता हे कंत्राटच रद्द करण्यात आले आहे.

या निर्णयानंतर सोमय्या म्हणाले की, ग्रामविकास खात्याला जयोस्तुते मॅनेजमेंटला दिलेले कंत्राट रद्द करावे लागल्याने त्यात घोटाळा झाल्याचे सत्य समोर आले आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

‘हसन मुश्रीफ राजीनामा द्या’

ग्रामपंचायतींचे टीडीएस रिटर्न भरण्याचे जयोस्तुते मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आलेले कंत्राट वादग्रस्त ठरल्यानंतर ते रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या निर्णयानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे टीडीएस रिटर्न भरण्यासाठी राज्यभरासाठी जयोस्तुते मॅनेजमेंट प्रा. लि. ही कंपनी निश्‍चित केली होती. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला या कंपनीला पैसे द्यावे लागणार होते. ही कंपनी मुश्रीफ यांच्या जावयाशी संबंधित आहे. या कंत्राटाच्या माध्यमातून दीड हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

याप्रकरणी त्यांनी ‘ईडी’कडेही तक्रार केली होती. मुश्रीफ यांनी त्यावर खुलासा करताना या कंपनीशी आपल्या जावयाचा काही संबंध नसल्याचे म्हटले होते. या कंपनीमार्फत टीडीएस रिटर्न भरण्याची कोणत्याही ग्रामपंचायतीवर सक्‍ती नाही. ते पूर्णपणे ऐच्छिक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता हे कंत्राटच रद्द करण्यात आले आहे.

या निर्णयानंतर सोमय्या म्हणाले की, ग्रामविकास खात्याला जयोस्तुते मॅनेजमेंटला दिलेले कंत्राट रद्द करावे लागल्याने त्यात घोटाळा झाल्याचे सत्य समोर आले आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button