हिना खान चा कुल लूक सोशल मीडियावर व्हायरल - पुढारी

हिना खान चा कुल लूक सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क

हिना खान एक प्रसिध्द स्टायलिश अभिनेत्री आहे. तिच्या स्टाईलचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. हिनाचे इन्स्टाग्राम अकाउंटवर ग्लॅमरस फोटो आहेत. हिनाने नूकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत हिना किलिंग पोज देताना दिसत आहे.

हिना खानने तिच्या इन्स्टा अकाउंटवर फोटो पोस्ट केले आहेत. या नवीन आणि कॅज्युअल लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. हिना खान ग्लॅमर ब्लॅक स्लीव्हलेस टॉप आणि ब्राऊन ट्राउझर लुकमध्ये दिसत आहे. हिनाने व्हाईट कॅपही घातली आहे.

हिना खानच्या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुम्ही सौंदर्याची व्याख्या आहात’ अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट बॉक्समध्ये ‘तुम्ही परिपूर्ण हिना खान’ असे लिहिले आहे. टीव्ही सीरियल ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये हिनाने अक्षराची भूमिका साकारली आहे. त्यानंतर ती त्याच नावाने प्रत्येक घरात प्रसिद्ध झाली. यानंतर हिना बिग बॉसमध्येही दिसली होती.

हेही वाचलत का ?

Back to top button