'बिरबलाची खिचडी' ची चूल मांडत मविआ आमदारांकडून सरकारचा निषेध | पुढारी

'बिरबलाची खिचडी' ची चूल मांडत मविआ आमदारांकडून सरकारचा निषेध

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बोलाचीच कढी अन बोलाचाच भात, महाराष्ट्राची लावली वाट…, फसव्या जाहिरातींचा नुसताच घाट, महाराष्ट्राची लावली वाट…, पन्नास खोके, एकदम ओके…, अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत विधानभवन परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘बिरबलाची खिचडी’ म्हणून चूल मांडून शिंदे सरकारचा जाहीर निषेध केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सोळावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार निदर्शने करत सत्ताधाऱ्यांना अक्षरशः घाम फोडला. महाविकास आघाडीचे आमदार आक्रमकपणे आंदोलन करत असताना सत्ताधारीही आंदोलन करु लागले मात्र ‘पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणेने सत्ताधार्‍यांच्या आंदोलनाची हवाच निघून गेली. आपल्याला माध्यमांत जागा मिळत नाही, हे लक्षात येताच कुरघोडी करत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या समोर येऊन सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केले व माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांच्या ‘पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणेने सत्ताधाऱ्यांची गोची झाली.

हेही वाचा : 

Back to top button