सोलापूर : आयुक्तालयातच पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू | पुढारी

सोलापूर : आयुक्तालयातच पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहर पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल संजय सावरे (ड्रिल मास्टर) यांना बुधवारी आयुक्तालयातील पोर्चमध्ये हृदयविकाराचा झटका आला. दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल संजय सावरे हे ड्रिल मास्टर होते. पोलिस भरती झालेल्या नवीन मुलांना ते ड्रिल शिकण्याचे प्रशिक्षण देत होते. त्यामुळे सर्वजण त्यांना मास्तर म्हणूनच ओळखत होते. त्यांच्याकडे पोलिस मुख्यालयातील पोलिसांच्या घरांची देखभाल व सफाई कामगार यांच्यावर लक्ष ठेवून काम करून घेण्याचे काम होते.

बुधवारी सावरे हे कामानिमित्त पोलिस आयुक्तालयात आले होते. त्यांचे काम झाल्यावर दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ते आयुक्तालयातील पोर्चमधील माहिती कक्षाच्या समोर आले. चालतानाच त्यांना अचानक हृदविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी तेथील उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना पोलिस गाडीतून खासगी रूग्णालयात दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी संजय सावरे यांना मृत घोषित केले.

Back to top button