India-China Border : सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चीनची वेगवान हालचाल; बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक - लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे | पुढारी

India-China Border : सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चीनची वेगवान हालचाल; बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक - लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

पुढारी ऑनलाइन डेस्क : India-China Border : चीन पूर्व लडाखमधील गेल्या तीन वर्षाच्या लष्करी संघर्षादरम्यान अत्यंत वेगाने सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. तसेच एलएसीजवळ सैन्य कमी केले नाही.  एप्रिल-मे 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये अनेक घुसखोरी केल्यापासून पीपल्स लिबरेशन आर्मीने जड शस्त्रास्त्रांसह सुमारे 50,000 सैनिक पुढे तैनात ठेवले आहेत. त्यामुळे एकंदरीत एलएसी बाजूची परिस्थिती स्थिर आहे मात्र, ज्या प्रमाणे पायाभूत सेवांचा विकास होत आहे आम्हाला खूप बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी शुक्रवारी इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये सांगितले.

India-China Border : भारतीय लष्कराची देखील मजबूत तैनाती

लष्करप्रमुख पांडे पुढे म्हणाले, पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या 3,488 किमी लांबीच्या LAC च्या तीनही सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची देखील “मजबूत” तैनाती आहे. ज्यामध्ये “उच्च पातळी” ऑपरेशनल तयारी आहे.

“कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमच्याकडे पुरेसा साठा आहे. नवीन तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र प्रणालींचा समावेश करून, क्षमता विकास करणे याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे, आम्ही पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहोत. विशेषत: फॉरवर्ड एरिआमध्ये रस्ते, हेलिपॅड इत्यादीसारख्या सुविधा निर्माण करण्याकडे आमचे लक्ष आहे.” असे जनरल पांडे म्हणाले.

India-China Border : संवादानेच संघर्ष टाळू शकतो

पूर्व लडाखमधील डेपसांग मैदाने आणि डेमचोक येथील राहिलेले संघर्षपूर्ण मुद्दे चीनसोबतच्या राजनैतिक आणि लष्करी चर्चेमुळे सोडवले जातील, अशी आशा यावेळी लष्करप्रमुखांनी व्यक्त केली. संवादातून आणि एकमेकांशी बोलूनच आपण ही समस्या सोडवू शकतो. आमचे ध्येय आणि प्रयत्नही तेच आहेत. जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत आमचे सैन्य तैनात करणे, सतर्कता पातळी उच्च पातळीवर राहील, असे जनरल पांडे यांनी स्पष्ट केले.

India-China Border : दहशतवाद्यांना पाकिस्तान अजूनही पायाभूत सुविधा पुरवतोय

पाकिस्तानकडे वळताना ते म्हणाले की, लष्कराच्या “मजबूत” काउंटर घुसखोरी ग्रिड, आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून केलेले प्रयत्न आणि तेथे ड्रोनचा वापर यामुळे ७७८ किमी लांबीच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचे प्रमाण कमी झाले आहे. ड्रॉप शस्त्रे आणि ड्रग्समध्ये वाढ झाली आहे. शिवाय, पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना पायाभूत सुविधा पुरवत आहे. त्यात कोणतीही मोठी घट झालेली नाही.
“पाकिस्तानमधील देशांतर्गत परिस्थिती, राजकीय अस्थिरता असो, आर्थिक मंदी असो आणि अंतर्गत सुरक्षा परिस्थिती असो, मला वाटते की एलओसी आणि आयबीच्या बाजूने काय घडते त्याबद्दल आपण अत्यंत सतर्क असले पाहिजे,” जनरल पांडे म्हणाले.

हे ही वाचा :

सातारा : ‘अवकाळी’चा 483 हेक्टर शेतीला तडाखा

५ वर्षांपूर्वी हरवलेल्या विवाहितेचा लागला शोध; कोर्टाच्या आदेशान्वये सासरी रवानगी

Back to top button