Microsoft AI : मायक्रोसॉफ्ट लवकरच देणार 'को-पायलट'; कोणीही बनवू शकेल 'अॅप'; आणखी बरीच वैशिष्ट्ये... | पुढारी

Microsoft AI : मायक्रोसॉफ्ट लवकरच देणार 'को-पायलट'; कोणीही बनवू शकेल 'अॅप'; आणखी बरीच वैशिष्ट्ये...

पुढारी ऑनलाइन डेस्क : जवळपास सर्वच ठिकाणी Microsoft AI मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड, एक्सल, पॉवरपॉइंटचा वापर आपल्या सर्व कामांसाठी करतो. आता मायक्रोसॉफ्ट आता आपल्याला संपूर्ण मायक्रोसॉफ्ट ऑफिस त्याच्या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) टूल्ससह अपडेट होणार आहे. एआय संचालित नो-कोड डेव्हलपमेंटसह आउटलुक, पॉवरपॉइंट, एक्सेल वर्ड यासह आणखी एक पॉवर प्लॅटफॉर्मच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट रिइनव्हेंट करत आहे. त्यासोबतच त्यामध्ये को-पायलट सारखी नवीन वैशिष्ट्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये दिली जाणार आहे.

Microsoft AI : कंपनीने गुरुवारी एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. जे लोक मायक्रोसॉफ्ट 365वापरतात त्यांना लवकरच आता एआय को-पायलट मिळणार आहे, असे एका निवेदनात सांगतिले. को -पायलट हे मायक्रोसॉफ्टचे एक एआय टूल्ससह असलेले नवीन फिचर आहे. जे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये काम करत आहे त्यांच्यासाठी हा को-पायलट मोठा सहकारी ठरणार आहे.

Microsoft AI : आता कोणीही बनवू शकेल अॅप

हा कोपायलट तुम्हाला एखाद्या सल्लागाराप्रमाणे तुमच्या प्रोजेक्टमध्ये काम करताना तुम्हाला नवीन सोल्यूशन्स, काही सुधारणा, सूचना सांगू शकणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला एखादे अॅप किंवा बॉट तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या भाषेत त्याला सांगू शकता आणि हा को-पायलट तुम्हाला अवघ्या काही सेकंदात ते तयार करू शकते, असे कंपनीने सांगतिले आहे.

को पायलट हे एक असे वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला अॅप किंवा सॉफ्टवेअर डेवलपमेंटसाठी मोठी मदत करू शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कोपायलटम मुळे अॅप आणि सॉफ्टवेअर डेवलपमेंटचे कार्य इतके सोपे होणार आहे की आता अगदी कोणीही अॅप तयार करू शकतो. अशा पद्धतीची वैशिष्ट्ये असलेले हे को पायलट असणार आहे.

हे ही वाचा :

IND vs AUS ODI : मुंबईतील आजच्या वन-डे सामन्यावर पावसाचे सावट?

ChatGPT ने अमेरिकेत मेडिकलची परीक्षा केली पास, पण भारतात UPSC मध्ये झाले नापास

Back to top button