Digital Rupee : डिजिटल रुपीचा वापर वाढला, 130 कोटींचे ई-रूपी चलनात - निर्मला सीतारामन | पुढारी

Digital Rupee : डिजिटल रुपीचा वापर वाढला, 130 कोटींचे ई-रूपी चलनात - निर्मला सीतारामन

पुढारी ऑनलाइन डेस्क – Digital Rupee : भारतात डिजिटल करंन्सी म्हणजेच डिजिटल किंवा ई-रुपी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत देशात 130 कोटी किमतीचे ई-रुपी चलनात आले आहे. अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रायोगिक तत्वावर ई रुपीला 1 नोव्हेंबर 2022 मध्ये होलसेल सेगमेंटसाठी तर 1 डिसेंबरला 2022 ला लाँच केले होते.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री म्हणाल्या, ई-रुपयाचे सर्क्यूलेशन नऊ बँकांच्या अंतर्गत ठेवले आहे. यामध्ये स्टेट बंक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडौदा, यूनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आईडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी बँकांचा यामध्ये समावेश आहे.

Digital Rupee : होलसेल ई-रुपीचा मोठा वाटा तर रिटेल ई-रुपी साठी 4.14 कोटी रुपये जारी

लोकसभेत निर्मला सीतारामन यांनी लेखी उत्तर देताना सांगितले की देशात सध्या 130 कोटी ई-रुपी चलनात आहे. त्यापैकी 28 फेब्रुवारीपर्यंत 4.14 कोटी ई-रुपी आहेत तर होलसेल डिजिटल रुपीचा वाटा 126.37 कोटी रुपयांचा आहे.

ई-रुपी हे डिजिटल टोकन किंवा लीगल टेंडर अंतर्गत येते जे चलनातील भारतीय रुपयाच्या एकदम समान आहे. नोट असो किंवा नाणी ई-रुपी दोघांनाही एकदम समान आहे. याला योग्य बँकांद्वारे वितरित केले जात आहे. वापरकर्ते कोणत्याही दुकानात किंवा लोकांसह सहभागी बँकांद्वारे ई-रुपी प्रसारित करू शकतात. त्याचे वॉलेट वापरून दुकानातही पेमेंट करता येते.

हे ही वाचा :

Budget Session : दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; राजीनामा देण्याची मागणी

 

Back to top button