शरद पवार यांची आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट; सुरू झाली ‘ही’ चर्चा | पुढारी

शरद पवार यांची आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट; सुरू झाली ‘ही’ चर्चा

नगर; पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरचे आमदार निलेश लंके यांच्या निवासस्थानी भेट दिली. आमदार लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे राज्यभर कौतुक झाले होते. पवार यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

मात्र, लंके हे पवार यांच्या जवळचे असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तेच उमेदवार असतील अशीही चर्चा रंगली आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांना शह देण्यासाठी पवार यांनी आत्तापासूनच व्यूहरचना केल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार अहमदनगर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार एका व्यासपीठावर आले.

यावेळी खासदार डॉ. सुजय विखेही उपस्थित होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. ( पवार – निलेश लंके घरी भेट )

या कार्यक्रमानंतर पवार यांनी पारनेरचे आमदार लंके यांच्या निवासस्थानी भेट दिली.

लंके यानी घरी येण्याचा आग्रह केल्यानंतर पवार त्‍यांच्‍या घरी गेले. ( पवार – निलेश लंके घरी भेट )

पवार यांची ही कृती मोठा राजकीय संदेश देणारी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादीकडे होती.

त्यावेळी विखे-पाटील यांच्याऐवजी संग्राम जगताप यांना तिकीट दिले. त्यात जगताप यांचा पराभव झाला.

तेव्हापासून पवार आणि विखे यांच्यात राजकीय वितुष्ट आणखी वाढले.

कोरोना काळात उभारलेल्या कोविड सेंटरची चर्चा

निलेश लंके मूळचे शिवसैनिक. सेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर त्‍यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला.   निलेश लंके यांनी काेराेना काळात आपल्या कार्यपद्धतीमुळे लक्ष वेधून घेतले आहे.

लंके यांनी कोरोना काळात उभारलेले कोविड सेंटर संपूर्ण राज्यात मार्गदर्शक ठरले. शिवाय या पॅटर्नची चर्चाही झाली.

यानिमित्ताने लंके यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात संपर्क तयार केला आहे.

त्यामुळे त्यांची लोकसभेचे आगामी उमेदवार अशी चर्चा सुरू आहे.

लंके हे साध्या घरात राहतात, शिवाय त्यांचे कुटुंबही साधेपणाने राहते. याची चर्चाही सध्या जोरात सुरू आहे.

या इमेजचा त्यांना फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे.

( पवार – निलेश लंके घरी भेट )पवार यांनी लंके यांच्या घरी दिलेली भेट ही त्यांना बळ देणारी आहे.

त्यांच्या या भेटीमुळे राष्ट्रवादीचा गट उत्साही होता.

आमदार लंके यांचे साधे घर

आमदार निलेश लंके यांचे साधे मातीचे घर आहे. एका छोट्याशा खोलीत पवार यांचे स्वागत आमदार लंके, त्यांचा भाऊ, पत्नी, मुलं आणि आई-वडिलांनी केले. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आमदार लंके यांच्या वडिलांनी पवार यांचा फेटा बांधून सत्कार केला. पवार यांच्या भेटीने लंके कुटुंबीयांच चांगलीच तारांबळ उडाली.

हेही वाचलं का ? 

Back to top button