सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या कथित घोटाळ्याची केंद्रीय मंत्र्यांना दिली माहिती - पुढारी

सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या कथित घोटाळ्याची केंद्रीय मंत्र्यांना दिली माहिती

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिल्ली येथे शुक्रवारी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली (सोमय्या-मुश्रीफ) . यावेळी सोमय्या यांनी त्यांना राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कथित घोटाळ्याची माहिती दिली.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिल्ली येथे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली. त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून केलेल्या घोटाळ्याची माहिती त्यांना दिली.

मुश्रीफ यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आपल्या जावयास कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून त्याची माहिती त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना दिली.

राज्यपालांकडेही केली तक्रार

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेचे टीडीएस आणि जीएसटी भरण्याचे कंत्राट आपल्या जावयाशी संबंधित कंपनीला दिल्ल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गुरुवारी केली.

या कंत्राटासाठी फक्त सात दिवसांची वेळ देण्यात आली. या काळात दोन दिवसांची सुट्टी असल्याने ही निविदा फक्त पाच दिवसांत पूर्ण करण्यात आली. तब्बल दीड हजार कोटी रुपयांचे टेंडर केवळ पाच दिवसांचा वेळ देऊन निश्चित करण्यात आले. ही घाई ग्रामविकास विभागाने का केली, असे सोमय्या म्हणाले. ज्या कंपनीला काम मिळाले ती कंपनी मुश्रीफ यांचे जावई मतीन यांच्याशी संबंधित असून, हे टेंडर देण्यासाठी सासरे मुश्रीफ यांनी ही घाई केली, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. (#सोमय्या – मुश्रीफ )

हेही वाचा : 

Back to top button