कपिल सिब्बल यांच्या घरावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्ला | पुढारी

कपिल सिब्बल यांच्या घरावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या घरावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत मोडतोड केली. बुधवारी सिब्बल यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही तर निर्णय कोण घेते असा सवाल केला होता.

त्यावरून युवक काँग्रेस नाराज झाली आहे. या प्रकाराबाबत राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी निषेध व्यक्त करत अशा प्रकारांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचे ट्विट केले आहे.

पंजाबमधील नेतृत्वबदलानंतर सध्या तेथे अनागोंदी असल्यासारखी परिस्थिती आहे.

bollywood big releases : जाणून घ्या तब्बल २२ चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

‘२५ वर्षापूर्वी भाजीपाला विक्री करणारा अचानक २५ हजार कोटींचा मालक होतो’

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देऊन चरणजित चन्नी यांना मुख्यमंत्री केल्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल असे वाटत होते.

मात्र, अचानक प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला.

या गोंधळात पक्ष असताना ॲड. कपिल सिब्बल यांनी ‘काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्षच नसल्याने ही निर्णायकी स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका केली होती.

त्यांच्याशिवाय मनीष तिवारी यांनी त्याला दुजोरा देत असेच विधान केले होते.

अमरिंदर सिंग यांना पायउतार करताना, नव्याने मुख्यमंत्री ठरविताना कोणतीही चर्चा झाली नाही.

त्यानंतर पंजाबमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती पाहता अशा स्थितीत पक्ष दीर्घकाळ राहणे योग्य नसल्याचे सिब्बल यांनी नमूद केले.

पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही तर निर्णय कोण घेते अशी टीकाही त्यांनी केली होती.

Rashmika Mandanna पुरुषांच्या अंडरवेअरच्या जाहिरातीवरून ट्रोल!

Supreme Court : शेतकर्‍यांना हटविण्यासाठी कोणते उपाय योजले?

यावर युवक काँग्रेस आक्रमक झाली असून सिब्बल यांच्या दिल्लीतील निवासस्थानासमोर निदर्शने केली.

सिब्बल हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याने अशी निदर्शने झाल्याने अनेकांना धक्का बसला.

युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी सिब्बल यांच्या निवासस्थानाची मोडतोड केली.

Ratnagiri ZP : रत्नागिरी जिल्हा परिषदेत सावळा गोंधळ, पगार रत्नागिरीचा अन् काम करतात परजिल्ह्याचे

रत्नागिरी : पेवे-उंबरशेत खलाटी येथे सापडले ९ गावठी बॉम्ब

शर्मा यांनी केला निषेध

या प्रकारानंतर शर्मा यांनी ट्विट केले असून त्यात त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

‘कपिल सिब्बल यांच्या घरावर झालेला हल्ला आणि गुंडगिरीबद्दल ऐकून धक्का बसला आहे.

या प्रकारामुळे मी निराश झालोय. या निंदनीय कृतीमुळे पक्षाची बदनामी होते. काँग्रेसचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम ठेवण्याचा इतिहास आहे.

मत आणि धारणेतील मतभेद लोकशाहीमध्ये अविभाज्य आहेत. असहिष्णुता आणि हिंसा हे काँग्रेसच्या मूल्यांपासून आणि संस्कृतीसाठी वेगळे आहेत.

त्यामुळे या प्रकरणातील दोषींना ओळखून त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी विनंती मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना करतो.’

हेही वाचा : 

Back to top button