मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधात साधू-संत एकवटले, 'हे' आहे कारण... | पुढारी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधात साधू-संत एकवटले, 'हे' आहे कारण...

नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी, पुढारी वृत्तसेवा, राजधानी दिल्लीतील पूजाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. मौलवींना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वेतनाच्या धरतीवर पुजाऱ्यांना देखील वेतन देण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलक साधू-संतांनी यावेळी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर सामुहिक हनुमान चालीसा पठण केले.

भाजप नेते करनैल सिंह यांनी पुजाऱ्यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. हिंदू बांधवांकडून दिल्या जाणाऱ्या करातून ज्याप्रमाणे मौलवींना वेतन दिले जाते. त्याचप्रमाणे पुजाऱ्यांना देखील मानधन दिले जावे,असे सिंह म्हणाले. भाजप खासदार प्रवेश साहिब सिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहून वर्मा यांनी मशिदीत नमाज पठण करणाऱ्या मौलानांप्रमाणे मंदिरातील पूजारी तसेच गुरूद्वारातील ग्रंथियांना वेतन देण्याची मागणी केली होती. देशाची घटना धर्मनिरपेक्ष आहे. सर्व वर्गाकडून कर दिला जातो. अशात कुठल्या एका धार्मिक वर्गावर खर्च करणे योग्य नाही. जनतेच्या करावर सर्व धर्मबांधवांचा समान अधिकार आहे. अशात पूजाऱ्यांना देखील वेतन दिले जावे, अशी मागणी वर्मांनी केली होती. अशात या आंदोलनानंतर सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :

Back to top button