कोल्हापूर : कळंबा कारागृहात कैद्याच्या हल्ल्यात दुसऱ्या कैद्याचा मृत्यू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्याने केलेल्या हल्ल्यात सतपालसिंह जोगेंद्रसिंह कोठडा या कैद्याचा मृत्यू झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने कळंबा मध्यवर्ती कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी गणेश लक्ष्मण गायकवाड (राहणार वाशी, नवीमुंबई) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतपालसिंह कोठडा हा बराक क्रमांक एकमध्ये होता. त्याच्या शेजारीच असणाऱ्या गणेश गायकवाड याने मध्यरात्री अचानक त्याच्यावर हल्ला केला. मोठा दगड डोक्यात घातल्याने सतपालसिंह गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचाराकरीता शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
- हिंगोली : पोळ्या लाटण्याच्या बहाण्याने नेऊन तीन महिलांना लुटले
- सावकारी अन् लाचखोरीवर तक्रारींमुळेच राहील अंकुश
- राहुल गांधी यांच्यावरील भिवंडी न्यायालयातील सुनावणी ४ मार्चला