कसबा, चिंचवड पोटनिवडणूक : राऊतांचे मोठे विधान, म्हणाले... | पुढारी

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक : राऊतांचे मोठे विधान, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : जरी मुख्यमंत्री यांनी आवाहन केले असेल आणि राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पत्र लिहले असेल तरीही या निवडणुका होतील. आम्ही महाविकास आघाडी एकत्र राहू आणि महाविकास आघाडी कसबा-चिंचवड निवडणुका जिंकेल, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले. वाचा सविस्तर बातमी. (Sanjay Raut News )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत आहेत की, कसबा-चिंचवड पोट निवडणूक बिनविरोध व्हावी. त्याचबरोबर राज ठाकरे यांनीही सर्वांना आवाहन केलं आहे ही निवडणूक बिनविरोध व्हावी. यावर माध्यमांशी बोलत असताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “चांगलं आवाहन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. पण या महाराष्ट्रात सर्वात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात कोणी केली? या राज्याचं राजकारण कोणी गढूळ केले? सुडाचं राजकराण कोणी केले? यावरही चिंतन व्हायला हवं.

महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल

माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की,” देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी म्हंटले होते की, महाराष्ट्रात कटूता वाढली आहे आणि ती कटूता कमी झाली पाहिजे. यासाठी मी पुढाकार घेणार आहे. पण त्यांचं याबबत अजूनही पाऊल पडलेलं नाही. याबाबत राज्यातील जनतेला अजूनही संभ्रम आहे. आता प्रश्न राहिला आहे. कसबा आणि चिंचवडचा, भाजपने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. कॉंग्रेसनेही त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. चिंचवड बाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल.
कसबा आणि चिंचवड मतदारसंघात जे वातावरण सुरु आहे हे वातावरण या सरकारला अनुकूल नाही. विधानपरिषद जनतेने दाखवून दिले आहे की, राज्याच्या जनतेच्या मनात काय आहे. त्यामुळे सरकराला वाटतं की ही निवडणूक होऊ नये. जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल आणि ते सत्य आहे. या दोन्ही मतदारसंघातील जनमानस आम्हाला सांगतो येथील निकाल वेगळा लागेल. त्यामुळे या निवडणुका होतील.

Sanjay Raut News : लोकांचीही इच्छा निवडणुका व्हाव्यात

लोकांचीही अशी इच्छा आहे की, कसबा चिंचवड निवडणुका व्हाव्यात. त्यांना त्यांच्या भूमिका स्पष्ट करायच्या आहेत. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत जो निकाल लोकांनी दिला. तोच निकाल कसबा आणि चिंचवड बाबतीतही होईल. जरी मुख्यमंत्री यांनी आवाहन केले असेल आणि राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे पत्र लिहलं असेल तरीही या निवडणुका होतील आणि आम्ही महाविकास आघाडी एकत्र राहू. अंधेरीची पोटनिवडणूक अपवाद आहे. पंढरपूर आणि नांदेड येथे पोटनिवडणूक झाल्या. तेथे उमेदवार न देण्याचा नियम पाळला नाही.
हेही वाचा

Back to top button