आजचे राशिभविष्य (५ फेब्रुवारी २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (५ फेब्रुवारी २०२३)

राशिभविष्य

मेष ः वेळेचा दुरुपयोग कराल. यामुळे तुमचा मूड खराब होईल. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमचा तुमच्या जोडीदाराशी वाद होईल.

वृषभ ः कुटुंबातील लोकांसोबत जास्त वेळ घालवाल. दैनंदिन गरजा न भागविल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल.

राशिभविष्य

मिथुन : निराशावादी दृष्टिकोनामुळे प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे विचारशक्ती मंदावली आहे हे ओळखण्याची खरी वेळ आहे.

राशिभविष्य

कर्क : प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यासाठी शुभ दिवस. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील; पण जोडीदाराशीप्रेमाने वागा.

सिंह

सिंह : व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल.

राशिभविष्य

कन्या : तुम्ही वाचवलेले पैसे तुमच्या कामी येऊ शकतात; परंतु याचे तुम्हाला दुःखही होईल. नातेवाईक अचानक संध्याकाळी तुमच्या घरी येतील.

तुळ

तूळ : दुसर्‍यांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका.

राशिभविष्य

वृश्चिक : निसर्गाने लक्षणीय आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल.

राशिभविष्य

धनु : आर्थिक स्थिती सुधारेल. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता.

राशिभविष्य

मकर : कुटुंबातील गरजा पूर्ण करून तुम्ही बर्‍याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता; परंतु सर्वांपासून दूर होऊन स्वतःसाठी वेळ घालवू शकाल.

राशिभविष्य

कुंभ : काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील; परंतु केवळ गप्पा मारणार्‍या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका.

मीन

मीन : आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल.

– ज्यो. मंगेश महाडिक

 

Back to top button