अमरावती : पदवीधर मतदार संघातील मतमोजणी सुरू; टपाल मतमोजणी पूर्ण | पुढारी

अमरावती : पदवीधर मतदार संघातील मतमोजणी सुरू; टपाल मतमोजणी पूर्ण

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील टपाल मतमोजणी पूर्ण झाली आहे. २६५ टपाल मतदानापैकी अवैध मते ७३ तर वैध १९२ मते ठरली आहेत. सर्वाधिक अकोला जिल्ह्यातील ३४ अवैध मते आहेत. टपाल मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर आता पाहिल्या फेरीला सुरवात झाली असून महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे ८८ मतांनी पुढे आहे.
 विधान परिषदेच्या अमरावती विभागीय मतदार संघाच्या मतमोजणीला बडनेरा रोडवरील नेमानी गोडाऊन येथे आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्यासह २३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला आज होणार आहे.
विधान परिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या जागे करिता ३० जानेवारीला मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात ४९.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पसंती क्रमानुसार मतदान असल्याने निवडणुकीचा निकाल येण्यास बराच विलंब होणार असल्याची शक्यता आहे. सकाळी मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ झाला. सुरुवातीला स्ट्रॉंग रूममध्ये असलेल्या मतपेट्यातून मतपत्रिका मोजणीस सुरुवात झाली आहे. त्यानंतर अवैध मतप्रक्रिया वेगळ्या काढून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.
हेही वाचा 

Back to top button