मोठी बातमी : विशाखापट्टणम असणार आंध्र प्रदेशची नवी राजधानी ; मुख्यमंत्री रेड्डी यांची घोषणा | पुढारी

मोठी बातमी : विशाखापट्टणम असणार आंध्र प्रदेशची नवी राजधानी ; मुख्यमंत्री रेड्डी यांची घोषणा

पुढारी ऑनलाईन: आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी विशाखापट्टणम असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केली. मार्चमध्ये विशाखापट्टणम येथे होणार्‍या ग्लोबल इन्व्हेस्टर समिट तयारीच्या बैठकीला संबोधित करताना त्‍यांनी ही घोषणा केली.

या वेळी रेड्डी म्हणाले, येत्या काही महिन्यांत आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मी तुम्हालाही विशाखापट्टणम येथे आमंत्रित करत आहे. जी आगामी काळात आपली राजधानी असेल. मी स्वतः देखील येत्या काही महिन्यांत विशाखापट्टणम येथे स्थलांतरित होणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

मार्चमध्ये विशाखापट्टणम येथे होणाऱ्या ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट’च्या तयारीच्या बैठकीला संबोधित करताना रेड्डी म्हणाले की, ते येत्या काही महिन्यांत आंध्रप्रदेशचे कार्यालय विशाखापट्टणम या बंदर शहरात हलवले जाणार आहे. आणि यानंतर इथून पुढे आंध्र प्रदेशची राजधानी विशाखापट्टणम हेच शहर असणार असल्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या बैठकी दरम्यान स्पष्ट केले.

यापूर्वी आंध्रप्रदेशची राजधानी अमरावती

यापूर्वी 23 एप्रिल 2015 रोजी चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी सरकारने अमरावतीला आंध्र प्रदेशची पुढील राजधानी म्हणून घोषित केले.
यानंतर 2020 मध्ये जगन सरकारनेच आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्या असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कर्नूलची नावे समोर आली. मात्र, नंतर वायएसआर काँग्रेस सरकारने हा निर्णय मागे घेत अमरावतीला राजधानी बनवण्याची चर्चा केली.

विशाखापट्टणमच का?

टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू सरकारवर आंध्र प्रदेशातील विद्यमान वायएसआर काँग्रेस सरकारने जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. ज्यामध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर जमीन घोटाळा झाल्याचे म्हटले होते. ज्याचे केंद्र अमरावती होते. रेड्डी सरकारने या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केली होती. मात्र, चंद्राबाबू नायडू यांनी हे आरोप साफ फेटाळून लावले. या वादग्रस्त घडामोडींनंतर सत्ताधारी रेड्डी सरकारने आंध्रप्रदेशची राजधानी विशाखापट्टणम येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

Back to top button