ChatGPT : बंगळूर विद्यापीठाने ‘चॅट जीपीटी’वर घातली बंदी | पुढारी

ChatGPT : बंगळूर विद्यापीठाने 'चॅट जीपीटी'वर घातली बंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅट जीपीटी (ChatGPT) ची वाढती लोकप्रियता शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ओपन एआय (OpenAI) ने विकसित केलेल्या AI टूलवर आता बंगळूर येथील आरव्ही विद्यापीठाने बंदी घातली आहे. न्यूयॉर्क एज्युकेशन सिस्टमद्वारे एआय टूलवर बंदी घातल्यानंतर काही दिवसांनी हा अहवाल आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा, लॅब चाचण्या आणि असाइनमेंट दरम्यान चॅट जीपीटी वापरण्यापासून रोखण्यासाठी विद्यापीठाने कॅम्पसमध्ये या उपकरणावर बंदी घातली आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, आरव्ही विद्यापीठाने चॅटजीपीटीसह गिटहब को-पायलट आणि ब्लॅक बॉक्स सारख्या इतर एआय आधारित साधनांवरही बंदी घातली आहे. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये सादर केलेले काम मूळ नसल्याचा शिक्षकांना संशय आल्यास, विद्यार्थ्याला ते काम पुन्हा स्वतःहून करावे लागणार आहे. “आम्ही विद्यापीठातील सर्व विभागांना एक नोटीस जारी केली आहे. चॅट जीपीटी सारख्या काही AI साधनांवर बंदी घातली आहे. कारण, विद्यार्थी परीक्षेत किंवा त्यांच्या असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी चॅट जीपीटी (ChatGPT) वापरू शकतात. बंदी आधीच लागू करण्यात आली आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यापूर्वी, न्यूयॉर्क शहरातील सार्वजनिक शाळांमध्ये चॅटजीपीटीवर बंदी घातली होती.

हेही वाचा : 

Back to top button